mortal 
मुंबई

धक्कादायक प्रकार! घाटकोपरच्या 'या' रुग्णालयातून मृतदेह गायब; घटनेची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातून एक मृतदेह गायब झाला आहे. या 23 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा असल्याची शक्यता असून शवविच्छेदन होण्यापूर्वीच मृतदेह गायब झाल्याची घटना घडली आहे. 

3 जून रोजी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास 23 वर्षीय तरुणाला राजावाडी रुग्णालयाच्या आकस्मित उपचार केंद्रात आणण्यात आले होते. गंभीर जखमी असलेल्या या तरुणाचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. कोविड चाचणीसाठी मृतदेहाचे नमुने घेण्यात आले होते. तसेच शवविच्छेदन करण्यासाठी हा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला होता. मात्र,7 जून रोजी हा मृतदेह गायब असल्याचे आढळले.

उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आंग्रे यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. पुढील 5 दिवसात त्यांना याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भविष्यात अशी घटना पुन्हा होवू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना देखील अहवालामध्ये नमूद करण्याचेही त्यांना आदेशित करण्यात आले आहे. 

या अहवालानुसार जे व्यक्ती सदर घटनेबाबत दोषी आढळून येतील त्यांच्यावर पालिका सेवानियमावलीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले आहे.

5 मृतदेेह बेपत्ता नाहीत:

महानगर पालिकेच्या केईएम, नायर, सायन, जोगेश्वरी ट्रॉमा, कांदिवली शताब्दी या रुग्णालयातून कोविड बाधित 5 मृतदेह गायब झाल्याची चर्चा आहे. मात्र, हे मृतदेह गहाळ झाले नसून नातेवाईकांना संपर्क होण्यास विलंब झाल्याने हे प्रकार घडले आहेत. नातेवाईकांना अवगत करण्यात आले अथवा कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलिस प्रशासनासमवेत उचित कार्यवाही करण्यात आली आहे, असा दावा पालिकेकडून करण्यात आला.

mortal remain of a man missing from rajawadi hospital mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT