Raj Thackeray, Raju Shetty
Raj Thackeray, Raju Shetty 
मुंबई

राजू शेट्टींनी दुसऱ्यांदा घेतली राज ठाकरेंची भेट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (गुरुवार) पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. बैठकीला रविकांत तुपकर उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली, यात आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला. राज ठाकरे यांच्याबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व भाजपविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतली. महाआघाडीत मनसेला घ्यायला काँग्रेसचासुद्धा विरोध मावळेल अशी आशा आहे”, असे राजू शेट्टींनी सांगितले.

राजू शेट्टींनी राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच राजू शेट्टी पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात नवी समीकरणे दिसण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT