msrtc st reservation 3 lakh raise ticket selling revenue mumbai Sakal
मुंबई

Mumbai ST News : एसटीच्या आरक्षणात तीन लाखांची वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत तिकीट विक्रीला उदंड प्रतिसाद

प्रवाशांना घरबसल्या तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटीने अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) अद्ययावत ऑनलाइन आरक्षण प्रणाली यंदा १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. या प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून १ जानेवारी ते २० मे पर्यंत १२ लाख ९२ हजार तिकिटांचे आरक्षण झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात नऊ लाख ७५ हजार तिकिटाचे आरक्षण झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन लाखांनी जास्त आहे.

प्रवाशांना घरबसल्या तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटीने अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मोबाईल ॲपच्या माध्यमातूनदेखील प्रवाशांना तिकीट काढता येते.

ही दोन्ही माध्यमे १ जानेवारी २०२४ पासून अद्ययावत करण्यात आली. जुन्या प्रणालीतील अनेक त्रुटी काढून टाकल्याने ऑनलाइन आरक्षणप्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे.

या अद्ययावतीकरणामुळे प्रवाशांकडून दररोज दहा हजार तिकिटे आरक्षित केली जात असल्याची आकडेवारीही समोर आली आहे. या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतींचेदेखील आगाऊ आरक्षण मिळू शकते, असे महामंडळाने सांगितले आहे.

प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक

ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. हा हेल्पलाइन क्रमांक प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरू असणार आहे. तसेच ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरूनही तिकिटे आरक्षित न होण्याच्या (पेमेंट गेटवेसंदर्भात) तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT