मुंबई

Mukesh Ambani: बनावट नंबर प्लेट प्रकरणी मोठा खुलासा, 'या' दोघांची चौकशी

अनिश पाटील

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कार आणि संशयित इनोव्हा कारसाठी बनावट नंबर प्लेटचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणी नंबरप्लेट बनवणाऱ्यांची ओळख पटली असून याप्रकरणी चेंबूर आणि ठाण्यातील दोघांना चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ठाण्यातून एका दुकान मालकाची चौकशी करण्यात आली. याशिवाय चेंबूर येथील ही एकाची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी दिली आहे.

याप्रकरणी अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. एनआयएने मुंबई पोलिसांची इनोव्हा गाडी रात्री उशीरा ताब्यात घेतली. तीच गाडी अँटिलियाजवळ दिसली होती, असा संशय एनआयएला आहे. 

हेही वाचा- बोरीवली, दहिसरमधल्या नागरिकांसाठी पालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

कारचा क्रमांक बदलून या कटात ती वापरण्यात आल्याचा संशय आहे. पण सीसीटीव्हीच्या तपासणीत कारचा डॅशबोर्ड, समोरच्या बाजूची विशिष्ठ बनावट आदी गोष्टींच्या सहाय्याने या कारचा शोध लावण्यात आला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने संपूर्ण घटनाक्रम पडताळण्यात आल्यानंतर एनआयए मुंबई पोलिसांची सीआययू वापरत असलेल्या या संशयित कारपर्यंत पोहोचले. ही कार आणि त्याची लॉगशीट ताब्यात घेण्यात आले. 

त्या संबंधीत चालकांचीही एनआयएने चौकशी केली. घटनेच्या दिवशी 25 फेब्रुवारीला ही इनोव्हा गाडी ठाण्यात नेण्यात आली होती. त्यानंतर तिचा क्रमांक बदलून पुन्हा मुंबईत आणल्याचा एनआयएला संशय आहे. त्यानंतर या इनोव्हाला पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठविले होते. या सर्व माहितीची एनआयए लॉगशीटच्या मदतीने तपासणी करत आहे. याशिवाय स्कॉर्पिओ कारमध्येही काही बनावट नंबर प्लेक सापडल्या आहेत. याशिवाय या स्कॉर्पिओला लावण्यात आलेल्या नंबरप्लेट ही बनावट होती. तिला निता अंबानी यांच्या पायलट कारचा क्रमांक देण्यात आला होता.

-------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mukesh Ambani Chembur and Thane police interrogated  fake number plate case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT