mumbai muncipal corporation
mumbai muncipal corporation esakal
मुंबई

मुंबई : पालिकेची आरोग्य व्यवस्था मोबाईलवर ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दवाखान्यां पासून थेट मुख्य रुग्णालया पर्यंतची महानगर पालिकेची (Corporation) आरोग्य व्यवस्था भविष्यात मोबाईलवर पाहाता येणार आहे. कोणत्या वेळी कोणता डॉक्टर उपलब्ध आहे. कोणत्या रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत अशी सर्व माहिती मोबाईलवर पाहता येणार आहे. महासभेत यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची ठरावाची सुचना मांडण्यात आली आहे.

महानगर पालिका रुग्णालयात अनेक वेळा अतिदक्षता विभागात तसेच व्हेटीलेटर उपलब्ध नसल्याने रुग्णांची फरपट होते. कोविड काळात महानगर पालिकेने कोविडसाठी राखीव असलेली सर्व व्यवस्थेचे डिजीटालायझेशन केले.पालिकेच्या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर रुग्णाला जागा असलेल्या रुग्णालयात पाठवले जात होते.त्याचा वापर भविष्यात आरोग्य यंत्रणेचे नियोजन करण्यासाठी केले जाण्याची शक्यता आहे.समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी याबाबत ठरावाची सुचना मांडली आहे.या ठरावाच्या सुचनेवर या महिन्याच्या महासभेच्या कामकाजात निर्णय होणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थांची सर्व माहिती मोबाईलवर उपलब्ध झाल्यास रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.त्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात यावे अशी ठरावाची सुचना रईस शेख यांनी मांडली आहे.

पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या वेळा दिवस रुग्णांच्या नातेवाईकांना माहित नसतात.त्यामुळे अनेक वेळा त्यांचा वेळ वाया जातोच त्याच बरोबर त्यांना दगदगही सहन करावी लागते.तसेच,रुग्णालयातील अतिविशेष सेवांचीही माहिती नसते.अतिविशेष सेवांचे बेड्स उपलब्ध असलेली माहितीही नसते.अशा वेळी रुग्णांची फरफट होते.त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची माहिती वेळापत्रक मोबाईलवर उपलब्ध होईल असे ॲप्लिकेशन तयार करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT