मुंबई : कोरोनाच्या मृत्यू दरात घसरण सुरूच

महिनाभरात 67 कोविड मृत्यूंची नोंद, ऑक्टोबरच्या तुलनेत 46 टक्क्यांनी घट
corona death
corona deathsakal

मुंबई : गेल्या 30 दिवसांत मुंबईत कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येच्या तुलनेत 46 टक्क्यांनी घट झाली आहे, असे पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 10 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत कोविडमुळे 124 मृत्यू झाले, तर 10 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत ही संख्या 67 एवढी होती.

मुंबईत राबवलेल्या वेगवेगळ्या कठोर उपाययोजनांमुळे आणि शहरातील 'मिशन सेव्ह लाईव्हज' या मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे असे मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत गंभीर ते सौम्य रूग्णांचा मागोवा घेतला गेला आणि वेळेत उपचार केले गेले. तरीही, शहराचा एकूण मृत्यू दर अजूनही 2.1 टक्के आहे.

corona death
Pune Crime: पोलीस आल्याचे पाहताच चोरट्यांनी काढला पळ

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मृत्यूंच्या वाढत्या आकड्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ‘मिशन सेव्ह लाईव्हज’ मोहिम सुरु झाल्यापासून, मृत्यू दर 2.1 टक्क्यांवर आला आहे आणि दैनंदिन कोविड मृत्यू दर देखील 1 टक्क्यांच्या खाली आला आहे.

आमचे मुख्य लक्ष शहरातील दररोजची प्रकरणे आणि मृत्यूची संख्या कमी करणे हे होते. गेल्या एका महिन्यांपासून कोविड मृत्यूंची नोंद एक आकड्यावर केली जात आहे. तर, दोन वेळा 0 मृत्यूंची नोंद मुंबईत करण्यात आली आहे, असेही काकाणी यांनी सांगितले.

11 मार्च 2020 रोजी मुंबईत कोविड-19 चा पहिला रुग्ण आढळून आला. त्या महिन्यात 119 प्रकरणे आणि 14 मृत्यू झाल्यामुळे एप्रिलमध्ये प्रकरणांची संख्या 5,904 वर पोहोचली आणि मृतांची संख्या 431 वर पोहोचली. त्यानंतर रुग्णांची संख्या 33,189 वर गेली. आणि मृतांचा आकडा 2,414 वर पोहोचला होता, जो पहिल्या लाटेत सर्वाधिक होता. मार्च ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत पहिली लाट होती. त्यानंतर, शहरात दिलासादायक वातावरण होते. पण पुन्हा एकदा, फेब्रुवारी 2021 च्या अखेरीस प्रकरणे वाढू लागली, जेव्हा दुसरी लाट सुरू झाली.

corona death
धक्कादायक : आई, मुलगा गंभीर जखमी...तर बाजूलाच पित्याचा मृतदेह

कोविड-19 मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणाले, “सार्स कोविड 2 हा एक नवीन विषाणू आहे, त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधकांना या साथीच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती नव्हती. म्हणून, प्रत्येकजण चाचणी आणि त्रुटीतूनच शिकत होते. पहिल्या लाटेत, लक्षणे दिसू लागल्याच्या तीन ते सहा दिवसांनंतर सुमारे 21,000 रुग्ण दाखल झाले. या विलंबामुळे 50 टक्के रुग्णांचा मृत्यू दाखल झाल्यानंतर 48 तासांत झाला. 'चाचणी, ट्रेस आणि उपचार' या तीन सूत्रींवर आधारीत उपचार केले गेले. ज्यातून रुग्ण मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात मदत झाली.

शिवाय, महानगरपालिकेने वॉर्ड वॉर रूम्सची स्थापना केली, ज्यामुळे बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास मदत झाली. गेल्या 30 दिवसांत रुग्णांच्या संख्येत तसेच मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे. हा आजार आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. मात्र, झोपडपट्टी आणि इतर काही भागात लसीकरण अद्याप अपुरे आहे. त्यामुळे, जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरणाला 10 महिने पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी बूस्टर डोसची आवश्यकता आहे, असेही डॉ. सुपे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com