Mumbai sakal media
मुंबई

मुंबई : पश्चिम रेल्वेवरून किसान रेल्वेच्या 101 फेऱ्या पूर्ण

तर, मालवाहतूक, तिकीट चेकिंग, पार्सलवाहतूक करून 8 हजार कोटींचा महसूल जमा करण्यात पश्चिम रेल्वेला यश मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नाशवंत पदार्थांचा, फळे, फुले, भाज्यांचा पुरवठा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरून वेगाने किसान रेल्वे सुरू आहे. 'हंगरी फॉर कार्गो' या संकल्पनेच्या आधारे पश्चिम रेल्वेद्वारे मालवाहतुकीसाठी, किसान रेल्वे धावण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात फक्त सात महिन्यात किसान रेल्वेच्या 101 फेऱ्या झाल्या. तर, मालवाहतूक, तिकीट चेकिंग, पार्सलवाहतूक करून 8 हजार कोटींचा महसूल जमा करण्यात पश्चिम रेल्वेला यश मिळाले आहे.

पश्चिम रेल्वेवरील सर्वात प्रथम किसान रेल्वे 24 नोव्हेंबर 2020 रोजी धावली. या रेल्वेमधून कांद्याची वाहतूक मध्य प्रदेश ते आसामपर्यंत केली होती. चालू आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंत पश्चिम रेल्वेद्वारे 101 किसान रेल्वे चालविण्यात आल्या. 101 वी किसान रेल्वे मध्यप्रदेश ते बिहार यादरम्यान चालविण्यात आली.

पश्चिम रेल्वेद्वारे नवी दिल्ली, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यातील विविध भागात 26 हजार टन शेती उपयोगी सामग्रीची वाहतूक करण्यात आली. तसेच कांदा, लसूण, चिकू, केळी यांची वाहतूक केली. ज्यातून रेल्वेला 10 कोटी रुपये महसूल मिळाला.

पश्चिम रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण 8 हजार 19 कोटी रुपयांचा महसूल मालवाहतूकीतून मिळविला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्क्यांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. प्रवासी, पार्सल आणि तिकीट तपासणीमधून 100 टक्के महसूल वाढला आहे. प्रवाशांमधून एकूण 26 कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात पश्चिम रेल्वेवरून 444 पार्सल विशेष ट्रेनच्या माध्यमातून 1.74 लाख टनांहून अधिक वजनी वस्तुची वाहतूक करण्यात आली. यामध्ये कृषि उत्पादने,औषधे, ऑपरेशनसाठी लागणारी साधने, मासे, दूध या प्रमुख वस्तुचा समावेश होता. याद्वारे पश्चिम रेल्वेला 61.92 कोटी रुपये महसूल मिळाला. पश्चिम रेल्वेद्वारे 75 हजार टनाहून अधिक वजनी 107 दूध विशेष ट्रेन चालविण्यात आल्या. तर, 123 कोविड-19 विशेष पार्सल ट्रेनमधून 24 हजार 500 टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली. 113 इंडेंटेड रेक चालवून 48 हजार टन सामग्रीची वाहतूक करण्यात आली. 22 हजार 230 मालगाडीचे रेक चालविण्यात आले, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

Shirur Kasar Loan Waiver: चार हजार ५२१ शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग झाला मोकळा; शिरूर कासार; कर्जमुक्तीची पहिल्या टप्प्याची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

Beed Water Shortage:आष्टी शहरासाठी १९ टँकरच्या खेपा; आष्टीकरांचे डोळे आकाशाकडे; १५ ते २० दिवसांनी मिळतंय पाणी

Marathi News Live Updates : डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी RSS वर बंदी घालून दाखवावी; भाजप प्रदेशाध्यक्षांचं ऑपन चॅलेंज

August 2026 Horoscope: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् उत्पन्नाचे नवे मार्ग; ऑगस्टमध्ये ‘या’ ४ राशींचे दिवस बदलणार

SCROLL FOR NEXT