Byculla Railway Station Sakal
मुंबई

Byculla Railway Station : देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा! भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार

देशातील १७० वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला आहे. प्राचीन वैभव जपल्याबद्दल, सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील १७० वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला आहे. प्राचीन वैभव जपल्याबद्दल, सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रमाणपत्रासह युनेस्को एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा पुरस्कार प्राप्त झाला. यामुळे मुंबई-महाराष्ट्रासह देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. युनेस्को’ही संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे.

भायखळा रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात जुन्या कार्यरत रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. भायखळा स्थानकाच्या प्राचीन वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प रेल्वे प्रशासनाने हाती घेतला. जुलै २०१९ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पाचे समन्वयन 'आय लव्ह मुंबई'च्या विश्वस्त शायना एनसी यांनी केले.

वारसा वास्तू संवर्धनासाठी कार्यरत प्रसिद्ध वास्तुविशारद आभा लांभा आणि बजाज ट्रस्टने सामाजिक दायित्व निधी (सीएसएआर) अंतर्गत हा प्रकल्प साकार केला. स्थानकाचे प्रवेशद्वार, खिडक्या, फसाड यांचे काम यावेळी करण्यात आले.

सुरुवातीला १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. करोनामुळे लांबल्याने तीन वर्षांनंतर संवर्धनाचे काम पूर्ण झाले. प्रकल्पासाठी चार कोटींचा खर्च आला. २९ एप्रिलमध्ये स्थानकाच्या वारसा वास्तूचे जतन आणि संवर्धनाचे काम पूर्ण झाले आणि स्थानकाला नवी झळाळी मिळाली.

Byculla Railway Station

विशेष म्हणजे स्थानकात गॉथिक शैलीतील वास्तुकलेचे रेखाटन आहे. वारसा वास्तूचे जतन आणि संवर्धनामुळे युनेस्को पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकताच शायना चुडासामा मुनोत, मीनल बजाज आणि आभा नारायण लांबा यांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हा कौतुकास्पद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT