Crime News
Crime News esakal
मुंबई

Mumbai : आयएसआयएस सबंधित 19 ठिकाणी छापेमारी...8 अटकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने सोमवारी दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या विरोधात देशभरात 19 ठिकाणी मोठे छापे टाकले असून कारवाईत 8 आरोपींना अटक केली आहे. एनआयएने महाराष्ट्रात अमरावती, पुणे आणि मुंबईत छापेमारी केली आहे. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, झारखंड, दिल्लीसह 19 ठिकाणी छापे टाकत 8 आरोपींना अटक करण्यात आले.

या छाप्यात अनेक स्फोटक, केमिकल, गनपावडर , धारधार शस्त्र आणि इलेक्टरॉनिक साहित्य जप्त केले आहे. देशात घातपाताच्या कारवाया करण्याचे आरोपींचे मनसुबे होते. या कारवाईत मिनाज उर्फ मोहम्मद सुलेमान या महत्वाच्या आरोपीला एनआयएने ताब्यात घेतले आहे. आरोपी मिनाजने आयसीस या दहशतवादी संघटनेने भारतातील तरुणांना सहभागी करून घेण्याचे आरोप आहेत.

आयसीसचे नेटवर्क

छाप्यांदरम्यान, एनआयएने दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि परदेशी स्थित आयएसआयएस हँडलर्सच्या सहभागासह त्यांच्या द्वारे आखलेल्या कटाचा पर्दाफाश केला आहे. एनआयएच्या तपासात भारतामध्ये आयसीसच्या दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी कटिबद्ध कार्यकर्त्यांचे एक जटिल नेटवर्क उघड झाले आहे. या नेटवर्कने आयसीसच्या नेत्याशी एकनिष्ठ असल्याची शपथ घेतली होती. तसेच हे नेटवर्क बॉम्ब स्फोटक उपकरणे (IEDs) देखील तयार करत होते. देशात दहशतवादी कारवाया करणे हा या संघटनेचा उद्देश होता.

युवक टार्गेटवर

आयसिसच्या नेटवर्कमध्ये पुण्यातील अतिरेकी सहभागी झाले होते. भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे उद्दीष्ट आयसीस या संघटनेचे आहे. त्यासाठी युवकांचा शोध घेऊन त्यांना कट्टरवादाकडे मत परिवर्तन करण्याचे काम हे करत होते. मागील महिन्यात एका अतिरेक्यास अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून देशाच्या लष्करी स्थळांवर हल्ल्याची योजना या अतिरेक्यांनी आखल्याची माहिती मिळाली.कोंढवा तालाब फॅक्टरी इथे इसेन्शिया सोसयटीमध्ये शोएब अली शेख यांच्या घरी छापेमारी केली. यावेळी लॅपटॅाप आणि मोबाईल जप्त केले आहे. मोमीनपुरा गुलमोहर सोसायटीमध्ये अन्वर अली यांच्या घरी ही कारवाई केली. 2023 मध्ये एनआयएने दाखल केलेल्या आयसिस संबंधांतील केसमध्ये एटीएसच्या मदतीने ही छापेमारी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT