मुंबई

मुंबईत भेसळीचे ३.५ लाख लिटर दूध

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दुधात भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

मुंबईत रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. सणासुदीवेळी ग्राहकांना भेसळ केलेले दूध विकले जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी झालेल्या कारवाईत सुमारे साडेतीन लाख लिटर दूध सील करण्यात आले. 

किमान २० हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या मुलुंड नाका, दहिसर नाका, मानखुर्द नाका, ऐरोली टोल नाका, मुलुंड पूर्व नाका या पाच ठिकाणी दुधाची तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनात झालेली ही मोहीम पाचही ठिकाणी एकाच वेळी पहाटेपर्यंत सुरू होती. या तपासणीत २२७ वाहनांतील नऊ लाख २२ हजार ९२८ लिटर दूध तपासण्यात आले. या प्राथमिक तपासणीत दुधाचे पाच ब्रॅण्डचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळून आले. त्यामुळे तीन लाख ४४ हजार लिटर दूध सील करण्यात आले. तसेच, दुधाच्या आठ टॅंकरमध्ये भेसळयुक्त दूध आढळले. या भेसळीत अमोनिआ सल्फेट, शुगर, माल्टोडेक्‍स्ट्रीन हे घातक पदार्थ आढळले. त्यामुळे हे १९ हजार २५० लिटर दूध नष्ट करण्यात आले. हे दूध ज्या जिल्ह्यांतून आले होते, त्या जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT