मुंबई

Lalbaug Fire: भीषण आगीत एकाचा मृत्यू; आग नियंत्रित झाल्याची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबईतल्या लालबाग परिसरातल्या अविघ्न पार्क नावाच्या एका 60 मजली इमारतीला आज दुपारी 12 च्या सुमारास आग लागली. या आगीमधून बाहेर पडण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने 19 व्या मजल्यावरुन उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. ही आग सुरुवातीला 25 व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. मध्यभागी आग लागल्याने ती खाली आणि वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत होती. मात्र, अग्निशमन दलाने ही आग विझवायला सुरुवात केल्यानंतर ती आटोक्यात आली. सुरुवातीला आग विझवण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या.

या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या आगीस कारणीभूत घटकांचा शोध घेऊन उचित कारवाई केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. सध्या ही आग नियंत्रित आल्याची माहिती आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.

शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जीव वाचवण्यासाठी खाली पडलेल्या व्यक्तीला केईएम रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं आहे. नवीन इमारत असल्याकारणाने खूप लोक इमारतीत नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT