Accident  Esakal
मुंबई

Mumbai Accident: डंपरच्या धडकेत मुलाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचे ‘रास्ता रोको’

Latest Mumbai News: आपल्या मोर्चा मानखुर्द-घाटकोपर मार्गावर वळवून रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

Chembur Latest Update: शौचालयात जाणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलाला पालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या डंपरने जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

गोवंडीतील शिवाजीनगर येथे आज सकाळी ११ वाजता ही घटना घडली. त्यानंतर डंपरचालकाला त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. हमीद शेख असे मृत मुलाचे नाव आहे.

गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात राहणारा हमीद शौचालयात जाण्याकरिता मार्ग ओलांडत असताना अचानक डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा खाली करून येणाऱ्या भरधाव डंपरने त्याला जोरात धडक दिली.

त्यामुळे हमीदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या अपघाताची माहिती मिळताच संतप्त स्थानिक नागरिकांनी डंपरची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. नंतर आपल्या मोर्चा मानखुर्द-घाटकोपर मार्गावर वळवून रास्ता रोको आंदोलन केले.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शिवाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढून वाहतूक पूर्ववत केली. मतीउर रेहमान तय्यब हुसेन सावंत (वय ३१) या डंपरचालकाला त्वरित अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT