Metro 
मुंबई

Mumbai Aqua Line Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिली भूमिगत मेट्रो 'या' दिवसापासून धावणार

Aqua Line Mumbai's First Underground Metro: आरे कॉलनी ते कफ परेड या ३३.५ किमी अंतरावर ही मेट्रो धावणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. २४ जुलै रोजी या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाईन अर्थात अक्वा लाईन जी कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी धावणार आहे. येत्या २४ जुलैपासून या मेट्रोला सुरुवात होत आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या ३३.५ किमी अंतरावर ही मेट्रो धावणार आहे. यामध्ये एकूण २७ थांबे असणार आहेत. या मेट्रोमुळं उपनगरीय प्रवास तसंच प्रत्यक्ष रस्त्यावरुन धावण्याऐवजी भूमिगत धावणार असल्यानं रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

दरम्यान, विनोद तावडे यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन सुकर बनवण्याची गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी आता पूर्ण होत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (अॅक्वा लाईन) २४ जुलैपासून सुरु होत आहे. ही मेट्रो मुंबई शहराच्या वेगाला नवा वेग देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT