Mumbai atal setu 
मुंबई

Viral Video: अटल सेतूवर कार थांबवली, कठड्याजवळ गेला अन्...घरी 5 वर्षांची मुलगी, अभियंत्याने जीवन का संपवलं?

Mumbai atal setu Road Man Suicide: व्यक्तीचे वय ३८ वर्षे आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai News: मुंबईतील अटल सेतूवरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कारुतुरी श्रीनिवास असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचं समजत आहे. व्यक्तीचे वय ३८ वर्षे आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास हा अभियंता आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक अडचणीत सापडला होता. तो डोंबिवलीतील पलावातील रहिवाशी आहे. घरी पत्नी आणि एक पाच वर्षांची मुलगी असं कुटुंब आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे.

सोशल मीडियामध्ये जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यातून दिसतंय की, एक व्यक्ती अटल सेतूवर आपली कार थांबवतो. कारच्या खाली उतरतो. कारची सर्व काचं लावून घेतो. कठड्याजवळ जातो आणि थेट समुद्रात उडी टाकतो. पुलावरील टोल नियंत्रण कक्षाने न्वावा शेवा पोलिसांना यासंदर्भातील सूचना दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले होते.

कारुतुरी श्रीनिवास यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असून मृतदेह खाडीमध्ये शोधला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दोन व्यावसायिंकांनी समूद्रात उडी टाकून जीव दिला आहे. त्यानंतर हा एक प्रकार घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Switzerland Bar Explosion : नवीन वर्ष साजरं करतानाच बारमध्ये भीषण स्फोट; अनेक पर्यटक ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती!

Satara Accident : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला युवक 400 फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी; कास पठाराच्या मार्गावर दुर्घटना

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये टोलनाका चालकांकडून मारहाण, कारवाईच्या मागणीसाठी टोलनाक्यावरच रस्ता रोको सुरू

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

SCROLL FOR NEXT