Ashish Shelar Ashish Shelar
मुंबई

Mumbai : चायनीज गणेश मूर्तीवर बंदी आणा; मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची मागणी

गणेशोत्सव मंडळांकडून 1 हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा निर्णय यावर्षी महापालिकेने केला होता, त्याला आमचा विरोध होता,

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बाजारामध्ये चायनीज गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात येऊ पाहत आहेत, त्यावर सरसकट बंदी आणा, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये संयुक्त बैठक झाली. गणेश मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांच्या विविध अडचणी आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष शेलार यांच्यासह महापालिका आयुक्त इक्बाल चहल, गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत तसेच मूर्तिकार संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळांकडून 1 हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा निर्णय यावर्षी महापालिकेने केला होता, त्याला आमचा विरोध होता, त्याबाबत चर्चा केल्यानंतर यावर्षी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम घेण्याचे पालिकेने मान्य केले आहे.

ही अत्यंत समाधानकारक बाब आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली. सरसकट पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालून कारखान्यांवर धाडसत्र, अशी कारवाई महापालिका करणार होती,

त्यालाही आमचा विरोध होता. याबाबत चर्चा करण्यात आली. पर्यावरण पूरक गणेशमूर्ती असाव्यात हा आग्रह चांगला आहे, मात्र एकाएकी निर्णय घेऊन एवढा मोठा बदल करता येणार नाही. त्यासाठी मूर्तीकारांयना काही वेळ द्यावा लागेल ,त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

तसेच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज गणेशमुर्त्या येत असून त्यावर सरसकट बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याला पालिकेने तयारी दर्शविली असल्याचे शेलार यांनी सांगितले.

काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर जुने खटले सुरू आहेत ते मागे घेण्यात यावे, अशी मागणी केल्याचेही शैलार यांनी सांगितले. गणेशोत्सव साजरा करताना, गणपती आणताना व विसर्जन मिरवणुका लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करावे, रस्त्यावर खड्डे असू नये, अशी मागणी आम्ही केल्याचे शेलार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT