मुंबई

शानदार, जिंदाबाद, जबरदस्त ! कॅप्टन अमोल यादव यांची गगनभरारी, विमानाच्या दोन चाचण्या यशस्वी

मिलिंद तांबे

मुंबई : आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी देशी बनावटीचे पहिले प्रवासी विमान पुर्णत्वास आले आहे. आज सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांनी भारतीय बनावटीचे पहिले 6 आसनी छोट्या प्रवासी विमानाने टेक ऑफ व लँडिंगच्या चाचण्या कशा पूर्ण केल्या. तब्बल 20 वर्ष अमोल यादव हे आपले विमान बनविण्यासाठी आणि विमान कारखाना सुरू करण्यासाठी धडपडत आहेत. मेक इन इंडीया अंतर्गत बनलेलं हे पहिलं विमान ठरले आहे.

अमोल यादव यांनी या 6 आसनी विमानाने धावपट्टीवरून टेक ऑफ करण्याची आणि लँडिंग करण्याची चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्याचप्रमाणे हवेत सरळ विमान चालविण्याची चाचणीही यशस्वीरित्या पार पाडली आहे. आता एका विमानतळावरुन दुसऱ्या विमानतळापर्यंत विमान चालविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे, असे अमोल यादव यांनी सांगितले. यासाठी दोन चाचण्या आवश्यक असून त्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हे विमान प्रत्यक्षात उड्डाण भरणार आहे.अमोल यादव यांना हे विमान उडविण्याची डायरेक्टर जनरल ऑफ सिविल अविएशन कडून परवानगी मिळण्यास खूपच उशीर झाला.

तसेच हे विमान उडविण्यासाठी विमा संरक्षण मिळणे सुद्धा तेवढेच आवश्यक होते. या दोन्ही बाबी पूर्ण झाल्यानंतरच आज त्यांनी आपले विमान प्रवासासाठी सिद्ध असल्याचे जाहीर केले. अमोल यादव यांनी 19 आसनी विमान तयार करण्यासाठी आपली “थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी” स्थापन केली आहे आणि त्यांना पालघर येथे सरकारने जागाही दिली आहे. स्पेशल परमिट टू फ्लायच प्रमाणपत्र मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अमोल यादव यांनी पुढे सांगितले. 

"भारतातील विमानं VT ने रजिस्टर होतात. त्यानंतरची तीन अक्षरं आवडीनुसार ठेवण्याची मुभा असते. 2011 मी नोंदणीसाठी अर्ज केला होता. परंतु नोंदणीच्या कामात दिरंगाई, ढिसाळपणा दिसला. यामुळे देशाचं बरंच नुकसान झालं होतं. हे विमान 2016 मध्ये मेक इन इंडियामध्ये सादर केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला, सहकार्य केलं. त्यांच्यामुळे देशाचं मोठं नुकसान टळलं. त्यामुळे विमानाच्या नावातील NMD हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे," असं अमोल यादव यांनी सांगितलं.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai based caption amol yadav successfully tested fully homogeneous charted plane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT