Mumbai BDD chawl sakal
मुंबई

Mumbai News : संक्रमण शिबिरातील गैरसोयींमुळे बीडीडी प्रकल्पग्रस्त हैराण

शिवडी येथील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या बीडीडी चाळीतील नागरिक या शिबिरातील गैरसोयींमुळे हैराण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवडी येथील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या बीडीडी चाळीतील नागरिक या शिबिरातील गैरसोयींमुळे हैराण झाले आहे. अशातच म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकाही या तक्रारींची दखल घेत नसल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.

तर या संक्रमण शिबिरांपासून ना बाजार जवळ ना रेल्वे स्टेशन त्यामुळे किमान पर्यायी व्यवस्था उभारण्यात यावी अशी मागणी या शिबिरात वास्तव्यास असणारे नागरिक सातत्याने म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेकडे करत आहेत. इतकेच नाहीतर या समस्यांनी इमारतीतील त्रस्त नागरिकांनी आता लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे. मात्र अद्याप समस्येवर तोडगा निघाला नसल्याने नागरिक आता हैराण झाले आहेत.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडा अंतर्गत उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी वरळी, नायगाव, डिलाईन रोड याभागात बीडीडी चाळीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना शिवडी येथील संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. ज्यांना संक्रमण शिबिरात जायचे नसेल त्यांना घरभाडे देण्यात येत आहे.

मात्र, शिवडी येथील संक्रमण शिबिरात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याविषयी माहिती देताना संक्रमण शिबिरातील गृहस्थ म्हणाले, "आम्हला घर खाली करण्यासाठी घाई करण्यात येते. त्यावेळी आम्हाला सांगण्यात येते की, संक्रमण शिबिरात तुम्हाला २४ तास पाणी, वीज आणि स्वच्छता या सोयी असतील. मात्र आज तिथे पाण्याची गैरसोय आहे. घरापासून बाजार दूर आहे, ट्रेन, बस या व्यवस्थाही नाही. त्यामुळे या संक्रमण शिबिरात कोणीही नागरिक जात नाहीये. जे गेले त्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे."

"मी नायगाव मध्ये १७ बीमध्ये राहत होतो. गेल्यावर्षी दिवाळीत आम्ही संक्रमण शिबिरात स्थलांतरित झालो. आम्हाला तेव्हा सांगण्यात आले की तिथे २४ तास पाणी असेल. आम्ही तिथे गेल्यावर केवळ १ महिना आम्हाला 2 तास पाणी मिळाले. मात्र आता तिथे पाण्याचा अत्यंत तुडवडा आहे. कोणाकडे पाणी येते कोणाकडे नाही येत. पाण्याचा साठा होत नाही अशी उत्तरे म्हाडाकडून मिळतात. मुंबई महापालिकेवाले म्हणतात की नाही तुम्हाला इतकाच पाणीपुरवठा करण्यात येईल. महापालिका आणि म्हाडा दोघेही उडवाउडवी करत असल्याचे," शिवडी संक्रमण शिबीर इमारत ५सीमधील रहिवाश्याने सांगितले.

घरभाडेही थकवले

रोहन पवार या नायगाव बीडीडी चाळ क्रमांक २१, रूम नंबर ८० मध्ये वास्तव्यास होते. सध्या पवार शिवडी भोईवाडा येथे भाडेतत्वावर घर घेऊन राहत आहेत. त्यांची खोली बीडीडीचाळ पुनर्वसन प्रकल्पात गेली. यावेळी म्हाडाकडून भाडं देण्यात येणार हे सांगण्यात आले. पवार यांचे म्हणणे आहे की, आम्हाला ११ महिन्यांचे भाडे देणार हे सांगण्यात आले होते. मात्र केवळ ५ महिन्यांचे घरभाडे देण्यात आले असल्याचा आरोप पवार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT