भक्तीपार्क  sakal
मुंबई

मुंबई : पालिकेच्या वनाला सिनेमा, कॉर्पोरेटलाही मोह

महानगर पालिकेच्या शहरी वनाची आता सिनेमांसह कॉर्पोरेट जगतालाही मोह पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानगर पालिकेच्या शहरी वनाची आता सिनेमांसह कॉर्पोरेट जगतालाही मोह पडला आहे. भक्तीपार्क येथील मियावाकी वनात चित्रीकरणासह पिकनीकसाठी कल वाढू लागला आहे.पुर्व उपनगरातील 98 हजार चौरस मिटर क्षेत्रफळावर पसरलेले हे सर्वात मोठे उद्यान आता चांगलेच बहरले आहे.

महानगर पालिकेने शहरी वनिकरणासाठी मियवाकी हे जापानी तंत्रज्ञान स्विकारले आहे.मुंबईतील अनेक भागात वेगाने वाढणारी ही वने तयार करण्यात येत आहेत.26 जानेवारी 2020 मध्ये या वनीकरणाला प्रारंभ झाला.अल्पावधीतच हे शहरी वन सिनेमा,जाहीराती,मालिका जगतात प्रसिध्द झाले आहेत.या वनात चित्रीकरणासाठी महानगर पालिकेकडे अर्ज येऊ लागले आहेत.तर,कॉर्पाेरेट कंपन्याचे क्रिडा महोत्सवही होत आहेत.अशी माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली.

या उद्यानाचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे.58 चौरस मिटरवर वन विकसीत करण्यात आले आहे.तर,40 हजार चौरस मिटरवर खेळाचे मैदान तयार करण्यात आहे.या उद्यानात तब्बल तीन किलोमिटर लांबीचा वॉकिंग ट्रॅकही तयार करण्यात आला आहे.---नक्षत्र उद्यान

12 राशींचे व 27 नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे नक्षत्र उद्यान फुलले आहे. विशेष म्हणजे यातील बरीच झाडे दुर्मिळ आहेत. नक्षत्र उद्यानाला भेट देणार्‍याला आपल्या राशीचे कोणते झाड आहे, याची माहिती मिळते. राशी व नक्षत्रानुसार एकूण २७ प्रजातींचे मोठे वृक्ष असून यामध्ये वड, पिंपळ, आवळी, उंबर, जांभळी, खैर, वेलु, नागचाफा, पळस, बेल, अर्जुन, सांबर, फणस, शमी, रुई, कडूलिंब, मोह, इत्यादींचा समावेश आहे.

पक्षीनिरीक्षणासाठी पर्वणी

नागरी वन प्रकल्पात जवळपास 57 हजार देशी व औषधी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात पळस, बेहडा, सीताफळ, बेल, पेरू, सीता, अशोक, हरडा, खैर, बदाम, काजू, रिठा, बकुळ, आवळा, अर्जुन अशा प्रजातींचा समावेश आहे. वृक्षांचे घनदाट जंगलात रूपांतर होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबत विविध प्रजातीची फुलपाखरे, पक्षी, कीटक यांचा नैसर्गिक अधिवास म्हणून देखील हे उद्यान विकसित होत आहे.

विरंगुळा करण्यासाठी येणाऱ्यां बरोबरच पक्षीनिरीक्षण करणार्‍यांसाठी हे पर्वणीच ठरत आहे.तर उद्यानाच्या इतर भागात देशी, परदेशी औषधी प्रजातींची सुमारे दोन हजारपेक्षा मोठी फुलझाडे व फळझाडे आहेत. यामध्ये प्रामुख्याने खैर, सुरंगी, आवळा, अर्जुन, पिंपळ, उंबर, बकुळ, आंबा, जांभूळ, कांचन, बदाम, निलगिरी, फणस, भोकर, बेल, सुरू, रॉयल पाम, कडीपत्ता, नारळ इत्यादींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT