Mumbai
Mumbai 
मुंबई

मुंबईत 'बीपीसीएल' रिफायनरीत स्फोट; काहीजण अडकल्याची भीती

सकाळवृत्तसेवा

मुंबई : चेंबूर येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) हायड्रोजन टँकमध्ये आज (बुधवार) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटामुळे काही किलोमीटरच्या परीसराला हादरे बसले. या स्फोटात 21 जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या आगीमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने शेकडो कर्मचारी अडकले आहेत. मुंबई अग्निशमन दला बरोबर नाविक दलाचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्या बरोबरच कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

चेंबूर माहूल परिसरात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशच्या रिफायनरी आहेत. येथे कच्च्या तेलावर प्रक्रिया करुन पेट्रोल डिझेल देशभरात पाठवले जाते. चेंबूर येथील गवाण गाव परीसरातील या तेल शुध्दीकरण प्रकल्पामधील एका टँकमध्ये दुपारी अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे चेंबूर परीसराला भुकंपासारखे हादरे बसले. नंतर प्रचंड धूर होऊन आगीच्या ज्वाळाही काही किलोमीटरपर्यंत दिसत होत्या. या टँकमध्ये हायड्रोजनचा साठा असल्याचा प्रथमिक माहिती मिळत आहे. या आगीची धग प्रचंड असल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर येण्यास अडचणी येत आहेत. अग्निशमन दलाचे 10 बंब आणि दोन फोनचे टँक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

चौकशीची मागणी

या स्फोटाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT