Holi-Celebrations 
मुंबई

मुंबईत होळी, रंगपंचमी साजरी करण्याचा प्लॅन केलाय? मग हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गेले काही दिवस राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील रूग्ण मृत्यूदराचा दर कमी झाला असला तरी रूग्णवाढीचा वेग मात्र वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने होळी आणि धुलिवंदन किंवा रंगपंचमी साजरी करण्याबद्दल नियमावली जाहीर केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी २८ मार्चला साजरा होणारा 'होलिकोत्सव' आणि २९ मार्चला साजरा होणारा 'धुलिवंदन' किंवा 'रंगपंचमी' हा उत्सव खाजगी व सार्वजनिक जागेत सार्वजनिकरित्या साजरा करण्यास महापालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक स्तरावर होळी आणि रंगपंचमी साजरी न करण्याच्या आदेशांसोबतच 'मी जबाबदार' या मोहिमेअंतर्गत वैयक्तिकरित्यादेखील हा उत्सव साजरा करणं टाळावं असं आवाहन पालिकेकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने ट्विट करून एक परिपत्रक पोस्ट केलं आहे. होळी आणि धुलिवंदन साजरं करण्यावर निर्बंध लादण्यात आल्याची माहिती या ट्विटमधून देण्यात आली आहे. "मुंबईला सुरक्षेच्या रंगात रंगवूया! कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी होलिकोत्सव व धुलिवंदन/रंगपंचमी खाजगी तसेच सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल", अशा इशारा या ट्वीटच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच, मी जबाबदार हा हॅशटॅगही त्यासोबत ट्वीट करण्यात आला आहे. 

दरम्यान, आजच्या दिवसात मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत ३ हजार ५१२ नव्या रूग्णांची वाढ झाली. तर १ हजार २०३ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले. मात्र ८ रूग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. सध्या मुंबईत एकूण २७ हजार ६७२  अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दररोज वाढणाऱ्या रूग्णांच्या आकड्यामुळेच मुंबई पालिकेने होळी साजरी करण्यास मनाई केली असून मी जबाबदार या मोहिमेंअंतर्गत प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखावी असं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut song on Sachin Ahir :'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?', संजय राऊतांची सचिन अहिरांवर गाण्यातून टीका

IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

1,30,00,00,000 रुपयांचा मालक, तरीही सनी देओलच्या पायात फाटके बूट; Video Viral

Latest Marathi News Live Update : 'गोकूळ'साठी आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन

Crime: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT