bomb in Mumbai arrested
bomb in Mumbai arrested sakal
मुंबई

Mumbai : मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा आरोपी अटकेत....

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फसवा कॉल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे.आरोपीचे नाव नरेंद्र कवळे असे असून त्याला धारावी परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एका व्यक्तीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून बॉम्बच्या धमकीची माहिती दिल्यानंतर गेले गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शुक्रवारी रात्री 8.50 च्या सुमारास फोन करण्यात आला. त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले की एक व्यक्ती काही शस्त्रे आणि आरडीएक्स स्फोटक घेऊन उत्तर प्रदेशातून निघून गेली आहे. त्यानंतर त्याने नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याला एटीएसचा संपर्क क्रमांक देण्यास सांगितले आणि नंतर फोन बंद केला.

फोन करणारा हा मुंबईचा असून त्याने मोबाईल क्रमांकावरून कॉल केल्याचे तपासात समोर आले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात काही ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे त्यांनी नियंत्रण कक्षाला सांगितले.त्यानंतर आरोपीचे नाव नरेंद्र कवळे असे असून तो धारावी परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसाना महिती मिळाली. त्वरित आरोपीला धारावी परिसरातून पोलिसांना फसवणूक करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT