मुंबई

Mumbai Breaking: मुंबईकरांनो सावधान; मुंबईत वाढला 'क्षय' रोगाचा धोका

मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक अशरफ आजमी यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Breaking: क्षय रुग्णाचे अचूक निदान करण्यासाठी गेन एक्स्पर्ट मशीन उपयुक्त ठरते; मात्र मशीनसाठी कारटेज उपलब्ध होत नसल्याने निदान होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे टीबीचे रुग्ण व मृत्युसंख्येत वाढ होत असून याला पालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक अशरफ आजमी यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. औषधांचा साठा, कारटेजचा साठा उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मुंबई शहरामध्ये डिसेंबर २०२२ मध्ये टी.बी. रुग्णांची संख्या ६० हजार इतकी होती. त्यातील १० टक्के रुग्ण एमडीआरच्या दुसऱ्या टप्प्यातील बाधित टी.बी.चे रुग्ण होते. यापूर्वी टी.बी. रुग्णांचे निदान थुंकीद्वारे होत होते. थुंकीचा तपास मायक्रोस्कोपीद्वारे होत असल्याने त्याचा ॲक्युरसी रेट (अचूक निदान) ६५-७० टक्के होता. यामुळे काही निदान चुकीचे येत होते.

विज्ञानाने प्रगती केली आणि टीबी रुग्णाचे अचूक निदान करण्यासाठी सीबी गेन एक्स्पर्ट मशीन उपलब्ध झाली. त्यामुळे १०० टक्के एक्युरसी रेटपैकी ९८ अचूक निदान येऊ लागले. मात्र, मशीनसाठी कारटेज वेळेत न मिळणे, त्याचा स्टॉक उपलब्ध नसणे, यामुळे रुग्णांचे निदान करण्यासाठी पुन्हा मायक्रोस्कोपीचा वापर सुरू केल्याने अचूक निदान होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप आजमी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Murder Case: नातवाला संपवण्यापूर्वी बंडू आंदेकरचा सेफ प्लॅन उघड, नंबरकारी म्हणजे काय?

Agriculture News : ‘नाफेड’चा कांदा बाजारात आल्यास ट्रक जाळू; शेतकऱ्यांचा शासनाला थेट इशारा

Nashik News : 'पाणी वाचवा' मोहीम फक्त कागदावरच? सिडकोतील वारंवार होणाऱ्या जलवाहिनी फुटण्याच्या घटनांवर नागरिकांचा संताप

Thane News: आम्ही स्वतःला जाळून घेऊ! बेकायदा इमारतीमधील राहिवाशांची आर्त हाक; डोंबिवलीत काय घडलं?

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर 'ही' अभिनेत्री साकारणार पुर्णा आजीची भूमिका? 'त्या' गोष्टीमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT