Mumbai Building Collapse esakal
मुंबई

Building Collapse : नानावटी 'हॉस्पिटल'जवळची इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, चौघांना ढिगाऱ्याखालून काढले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील नानावटी हॉस्पिटलजवळील दोन मजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत दोन वृध्द नागरिकांचा मृत्यू झाला असून दोन जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रिस्किला मिसौइटा आणि रॉबी मिसौइटा अशी मृतांची नावे आहेत. इमारतीत अडकलेल्या एकूण 4 जणांना बाहेर काढण्यात यश आले आणि त्यानंतर कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विलेपार्ले पश्चिम परिसरात दुपारी 2:27 वाजता सेंट ब्राझ रोडवर, नानावटी हॉस्पिटलजवळ स्थित 3 मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

बचावकार्यात 4 रहिवाशांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आले आणि नजीकच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रिस्किला मिसौइटा आणि रॉबी मिसौइटा या दोन वृध्द नागरिकांना उपचारादरम्यान मृत घोषित केले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत दुसरी इमारत दुर्घटना घडली असून या विद्या विहार इमारत दुर्घटनेत तिसर्‍या मजल्यावर अडकलेल्या ३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. इमारतीत पोकळी बनवून पीडित लोकेशन कॅमेरा वापरून MFB द्वारे कसून शोध घेण्यात आला, तुळई आणि विभाजन भिंतीच्या अडथळ्यांमुळे अडकलेल्या व्यक्ती सापडत नाहीत. इमारतीच्या समोरचा भाग पाडण्यात आला या घटनेला 14 तास उलटून गेले असून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. वृद्ध महिला आणि पुरुष यांना काढण्यासाठी शासकीय यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT