Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : काँग्रेसच्या मेणबत्ती मोर्चाप्रकरणी गुन्हा दाखल; वर्षा गायकवाड, निरुपम, नसीम खान यांचा समावेश...

मणिपूरमधील घटनेविरोधात अद्याप ठोस कारवाई होत नसल्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी मुंबई काँग्रेस कार्यालयाजवळून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मणिपूरमधील घटनेविरोधात मुंबई काँग्रेसने सोमवारी संध्याकाळी काढलेल्या मेणबत्ती मोर्चाप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात 29 कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आदेशाचे पालन न करता परवानगी नसताना मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आमदार, झिशान सिद्धीकी, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री आरीफ नसीम खान, चरणजीतसिंह सपरा यांचा देखील दाखल गुन्ह्यात समावेश आहे.

मणिपूरमधील घटनेविरोधात अद्याप ठोस कारवाई होत नसल्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी मुंबई काँग्रेस कार्यालयाजवळून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता.

परंतु पोलिसांनी हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयाशेजारी अडवून नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

या मोर्चामध्ये वर्षा गायकवाड यांच्या समवेत माजी खासदार संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार जिशान सिद्दीकी, चरणसिंग सप्रा आदी नेत्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. परवानगीशिवाय मोर्चा काढणे व जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT