Mumbai sakal
मुंबई

Mumbai : फुटपाथवरील उघड्या चेम्बर मध्ये पडून नागरिक जखमी; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली परिसरात 90 फिट रोड येथील बालाजी आंगण मध्ये सुंदरम अय्यर हे राहण्यास आहेत. बुधवारी रात्री ते आपल्या पत्नीसह 90 फिट रोड वरील फुटपाथवर चालत होते.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - शहरातील फुटपाथवरील अवस्था दयनीय असतानाच त्यावरील गटारांची झाकणे कुठे तुटलेली तर कुठे उखडलेली असतात. गटारांची झाकणे तुटून अनेक अपघात होऊनही प्रशासन या झाकणांच्या देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने पहात नसल्याचे दिसते.

ठाकुर्ली येथील 90 फिट रोडवरील फुटपाथवरील गटारावर झाकण तुटलेले असल्याने त्यात पडून 50 वर्षीय नागरिक जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली परिसरात 90 फिट रोड येथील बालाजी आंगण मध्ये सुंदरम अय्यर हे राहण्यास आहेत. बुधवारी रात्री ते आपल्या पत्नीसह 90 फिट रोड वरील फुटपाथवर चालत होते.

याचवेळेस येथील फुटपाथवरील चेम्बरवर झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. रात्री चालताना अय्यर यांच्या ही बाब लक्षात आली नाही आणि त्यांचा तोल जाऊन ते गटारात पडले. सुदैवाने गटाराची उंची कमी असल्याने ते वाचले मात्र या दुर्घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी अय्यर यांना गटाराबाहेर काढले.

उपचारासाठी त्यांना जवळील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पायाला तब्बल 17 टाके पडले आहेत.

नागरिकाच्या सोयीसाठी प्रशासनाने फुटपाथची सुविधा दिली आहे. मात्र फुटपाथ वरील तुटलेली झाकणे दुरुस्त करण्यास मात्र प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे .दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालिकेने तत्काळ या तुटलेल्या चेम्बरवर झाकण बसवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT