मुंबई

Mumbai coldest weather | मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद

भाग्यश्री भुवड

मुंबई  : मुंबईत बुधवारी यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. माथेरान आणि मुंबईचा पारा 15.3 अंशांपर्यंत घसरला. सांताक्रूज वेधशाळेत 15.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाब्यात किमान तापमान 18 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 
सर्वात कमी तापमान 15.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे बुधवारी हवेत गारठा होता. त्यापूर्वी 16 जानेवारीला सांताक्रूझ येथे किमान तापमान 16.6 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते. त्याआधी, गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान 16 अंश सेल्सियस होते. 

वेधशाळेच्या अंदाजानुसार तापमानातील घट ही उत्तरेकडून सुटणाऱ्या शीत वाऱ्यामुळे झाली. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात तापमान कमी राहणार आहे. शिवाय ही घट पुढील दोन ते तीन दिवसही कायम राहण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती आयएमडीच्या पश्‍चिम विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली. 

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला हवेची पातळी सुधारली होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा एकदा हवेची गुणवत्ता खालावली. बुधवारी सकाळी संपूर्ण मुंबई शहराची हवा गुणवत्तेचा निर्देशांक (एक्‍यूआय) - 306 (अत्यंत निकृष्ट) प्रदूषक मापक निर्देशक-नोंदवला गेला. गेल्या आठवड्याच्या शेवटीही हवा गुणवत्ता अत्यंत खराब नोंदविण्यात आली होती आणि शनिवारी एक्‍यूआयची 320 आणि रविवारी 310 इतकी नोंद झाली होती; पण सोमवारी ती सुधारून (283) साधारण गटात आली होती

( संपादन - तुषार सोनवणे )

--------------------------------

Mumbai coldest temperature Record the lowest temperature of the season in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT