मुंबई

Corona Virus Update: मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 94 टक्क्यांवर

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत रविवारी 530 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख 2 हजार 753 झाली आहे. रविवारी 715 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 83 हजार 850 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. काल दिवसभरात 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 11 हजार 242 इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 392 दिवसांवर गेला आहे. तर 16 जानेवारीपर्यंत एकूण 25 लाख 96 हजार 790 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 10 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.21 इतका आहे.

मुंबईत काल मृत झालेल्या 5 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. रविवारच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 6 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. मृत झालेल्या मृत्यूंपैकी  एका रुग्णाचे वय 40 वर्षा खालील होते तर 6 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 131 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 2 हजार 326 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 2 हजार 851 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. रविवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 401 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai corona latest updates fresh 530 new covid 19 cases

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : तिरुवनंतपुरम जिल्हा क्रीडा परिषदेच्या कार्यालयात एसीचा स्फोट, २ जखमी

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT