Corona Updates in Mumbai
Corona Updates in Mumbai sakal
मुंबई

अत्यंत दिलासादायक! मुंबईत दिवसभरात सात हजारपेक्षाही कमी रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबईची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी आढळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये २० हजारहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, आता ही रुग्णसंख्या सात हजारापेक्षाही कमी सापडत आहे. आज मुंबईमध्ये फक्त ६,१४९ रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ७ मृत्यू झाले आहेत. दरम्यान, सोमवारच्या तुलनेत रूग्णसंख्या काहीशी कमी नोंदविण्यात आल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai Latest Corona Updates In Marathi)

आज नव्याने नोंदविण्यात आलेल्या रूग्णांपैकी ५,१६५ म्हणजेच ८४% टक्के रूग्णांना (Corona Symptoms ) कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. तर, आज ५७५ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Corona Discharge ) यातील ९५ रूग्णांना ऑक्सिजनची (Oxygen Support) गरज भासली आहे. तर आज १२,८१० रूग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर ९४% टक्क्यांवर नोंदविण्यात आला असून, रूग्ण दुपटीचा दर ६१ दिवसांवर पोहोचल आहे. सध्या मुंबईमध्ये ५२ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT