Corona positive sakal media
मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी 3 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai international airport) 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची (international travelers) आरटी-पीसीआर तपासणी (RTPCR Test) करण्यात आली. त्यापैकी 3 जण आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह (three people positive) आले आहेत. या तिघांचेही नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome sequencing) पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण कोरोना बाधित प्रवासी संख्या 9 झाली आहे

राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु असून विमानतळ आणि क्षेत्रिय अशा दोन्ही सर्वेक्षणातून आतापर्यंत एकूण 28 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 12 नमुने एनआयव्ही पुणे येथे तर 16 नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. या एकूण 28 जणांपैकी 25 जण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत तर 3 जण त्यांचे निकटसहवासित आहेत.

जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे निकाल रविवारी येण्याची शक्यता असल्याचे महागरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. त्यानंतर या रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे. सध्या ओमायक्रॉन बाधित रुग्ण सापडला नसून चाचण्यांवर भर देण्यात आला आहे असे ही काकाणी पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT