Mumbai News
Mumbai News Sakal
मुंबई

Mumbai News : हौसेला मोल नाही! मुलगा २ वर्षांचा अन् बर्थडे केक तब्बल २२१ किलोंचा

सकाळ डिजिटल टीम

हौसेला मोल नसतं,हेच खरं! अशीच एक गोष्ट वसईमधून समोर आली आहे. वसईत हौशी पालकांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलासाठी भलामोठा केक आणला आहे. हा केक दोन चार नव्हे तर तब्बल २२१ किलो वजनाचा आहे.

वसईतल्या कामण इथल्या डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या नवीन आणि शुभांगी भोईर यांनी आपला मुलगा रियांश याच्या वाढदिवसानिमित्त हा केक आणला आहे. रियांश सध्या दोन वर्षांचा आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर रियांशचा जन्म झाला. तसंच जन्मानंतर जवळपास एक महिनाभर तो एनआयसीयूमध्ये उपचार घेत होता. त्यामुळे या दाम्पत्याने रियांशला लाडाकोडात वाढवलं आहे.

त्याच निमित्ताने भोईर दाम्पत्याने रियांशच्या आवडीची फोर व्हीलर 'वरना'चा हुबेहुब केक बनवला आहे. हा केक २२१ किलो वजनाचा आहे. केक इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच असा भव्यदिव्य केक बनवण्यात आला आहे. रियांशच्या पहिल्या वाढदिवसाला या दाम्पत्याने त्याच्यासोबत हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेतली होती.

मॉन्जिनीज या कंपनीने हा भव्यदिव्य केक बनवला आहे. रियांश आमच्यासाठी देवाचं गिफ्ट आहे. म्हणूनच आम्ही त्याच्या वाढदिवसाला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, अशी प्रतिक्रिया रियांशचे वडील नवीन भोईर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT