oxygen
oxygen  file photo
मुंबई

चांगली बातमी- मुंबईची ऑक्सिजन चिंता मिटली कारण...

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून शनिवारी १६८ रुग्णांना उपनगरीय रुग्णालयातून कोविड रुग्णालय आणि जम्बो केंद्रात हलविल्यानंतर आज मुंबईची ऑक्सीजनची चिंता मिटली आहे. मुंबई महानगर पालिका आता रोज २८५ मेट्रीक टन ऑक्सीजनचा साठा करणार आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयांना ऑक्सिजनाचा पुरवठा पोहचण्यास विलंब होणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सहा रुग्णालयातील १६८ रुग्णांना शनिवारी हलविण्यात आले होते. सध्या मुंबई महानगर पालिकेचे १० हजार ६९ ऑक्सिजन बेड्स, दोन हजार ७५१ आयसीयू बेड्स आणि १ हजार ४१४ वेंटीलेटर बेड्स आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयांना सध्या २१० मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज लागते, तर पालिकेकडे २३५ मेट्रीक टनचा साठा असतो.

रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवताना विशेष काळजी घेणे गरजेचे होते. यात ३० अतिदक्षता विभागातीलही रुग्ण होते. शनिवारी पहाटे पाच पर्यंत सर्व यंत्रणा कार्यरत होती. हे काही तास माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. सर्व रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. मुंबई महानगर पालिकेने आता ५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रोज २८५ मेट्रीक टन ऑक्सीजन मुंबईला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT