देशभर केले गुन्हे अन् नालासोपा-यात येऊन लपले, पोलिसांनी केली अटक  sakal
मुंबई

Nalasopara Crime: देशभर केले गुन्हे अन् नालासोपा-यात येऊन लपले, पोलिसांनी केली अटक

Police : वसई न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: उत्तरप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र या राज्यात सोनसाखळी तसेच प्रवाशांच्या सामानाची उचलेगिरी करून फरार होणाऱ्या दोघा सराईतांना विरार गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.

या आरोपींवर ३०पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असून वसई न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

उत्तरप्रदेश राज्यातील मुरदाबादमधील २३ पीएस पोलिस छावणीजवळील आदर्श नगरमधील राहणारे आशीषकुमार ऊर्फ होलू ऊर्फ भादोरिया राजकुमार भातु (वय ३८), अमित कुमार प्रदीप कुमार (वय ३६) यांनी ३ जून रोजी नालासोपारात ४२ वर्षीय महिलेची गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून फरार झाले होते. याप्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विरार गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही, गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे १४ जून रोजी उत्तर प्रदेशातून या दोघांना ताब्यात घेतले होते.

यावेळी पोलिसांच्या तपासात दोघांवर नालासोपारा, अर्नाळा, बोईसर, ठाणे वर्तकनगर, यूपी मुरदाबाद सिव्हिल लाईन, आसमोली, पंजाबमधील रोपारा, हरियानामधील तानेसर, उत्तराखंडमधील चांदणी बाग, भिवानी सिटी यासह अन्य पोलिस ठाण्यात ३०पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT