Fraud  
मुंबई

Crime : बनावट पर्यटन कंपनीने डाव साधला! ज्येष्ठ महिलांना फसवणूक झाल्याचं विमानतळावर कळलं

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - देशाच्या विविध भागात एका बनावट पर्यटन कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी निघालेल्या डोंबिवली, कल्याणमधील तीन महिलांची 1 लाख 20 हजार रुपयांची पर्यटन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी भागातील रॉयल रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या जयश्री देशपांडे यांच्यासह त्यांच्या मैत्रिणी विद्या देशमुख आणि जया छेडा या ज्येष्ठ नागरिक महिलांची फसवणूक झाली आहे. तक्रारदार देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या आणि त्यांच्या मैत्रिणींनी देशाच्या आसाम, गुहावटी, मणिपूर, इम्फाळ, त्रिपुरा भागात पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता.

यासाठी त्यांनी फेसबुकवर दिसणाऱ्या एक पर्यटन कंपनीतील धारक हरिश सिंग यांच्याशी संपर्क साधला. आपण संपर्क साधत असणारी पर्यटन कंपनी बनावट आहे हे त्यांच्या निदर्शनास आले नाही.

सिंग याने या महिलांना आपण तुम्हाला इच्छित स्थळाची विमानाची तिकीट काढून देतो असे आश्वस्त केले. त्यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून प्रत्येकी 40 हजार रुपये उकळले. या महिलांना तुमची तिकिटे तुम्हाला विमानतळावर आल्यावर मी देतो असे आश्वासन बनावट पर्यटन कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

एक महिन्यापासून पर्यटनासाठी निघालेल्या मैत्रिणी तिकिट नोंदणीच्या गडबडीत होत्या. 24 मार्च हा पर्यटनासाठी निघण्याचा दिवस होता. देशपांडे यांनी सिंग यांना आमची तिकिटे आगाऊ पाठवून द्या, अशी मागणी केली. त्यावेळी भामटा सिंग याने तुम्ही विमानतळावर आल्यावर दोन तास अगोदर तुम्हाला तिकिटे मिळतील, असे सांगितले.

ठरल्या दिवशी तिघीजणी मुंबई विमानतळावर पोहचल्या. आता आपणास विमानाची तिकिटे मिळतील आपला पर्यटन प्रवास सुरू होईल या आनंदात तिघीजणी होत्या. विमान प्रवासाची वेळ जवळ आली तरी पर्यटन कंपनीचा सिंग आपणास तिकिटे पाठवित नाही. त्याला संपर्क केला तर त्याचा मोबाईल फोन बंद येऊ लागला.

बराच वेळ विमानतळावर वाट पाहूनही सिंग संपर्क करत नाही, हे लक्षात आल्यावर आपली सिंग यांनी फसवणूक केल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. पर्यटन कंपनीने आपली फसवणूक केल्याने टिळकनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. पिठे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT