Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला; डोंबिवलीतील घटना

बनावट चावीच्या आधारे घरातील 2 लाख 90 हजारचा माल चोरला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - घरातील मालकीण पतीसोबत बाहेर फिरायला गेली. याच संधीचा फायदा घेऊन ती सोसायटीमध्ये आली. बनावट चावीच्या आधारे घर उघडून तिने घरातील तब्बल 2 लाख 90 हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही व वॉचमन याच्याकडे चौकशी करत महिला आरोपीचा शोध घेत तिला अटक केली आहे. घरकाम करणारी सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम (वय 41) हिला पोलिसांनी अटक करत तिच्याकडून 2 लाख 55 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

डोंबिवली पूर्वेतील रामनगर रोडवरील नभागंन सोसायटी मध्ये राहणाऱ्या छाया साळवी यांच्याकडे सीमा ही 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत घरकाम करायला येत असे. त्याचवेळी तिने घराची रेकी केली होती.

12 ऑगस्टला छाया या पतीसोबत दुपारी बाहेर गेल्या होत्या. तास दीड तासाच्या कालावधीत त्यांच्या घरात चोरीची घटना घडून घरातील ऐवज चोरीला गेला होता. घरात चोरी झाल्याची बाब लक्षात येताच छाया यांनी रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

दाखल तक्रारीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, पोलीस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, दिलीप कोती यांच्या पथकाने तपास सुरू केला.

बनावट चावीच्या आधारे लॉक उघडून चोरी झाल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली. पोलिसांनी सोसायटी मधील सीसीटीव्ही व वॉचमन यांच्याकडे चौकशी करत घरकाम करणारी नेहा हीचा शोध घेत मद्रासी मंदिर परिसरातून तिला ताब्यात घेतले.

नेहा हिने गुन्ह्याची कबुली दिली असता तिला अटक करण्यात आली असून पोलिसांनी तिच्याकडून 2 लाख 55 हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 2 बनावट चाव्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. नेहा हिने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT