crime Husband commits suicide killing his wife and eight-year-old son pune police sakal
मुंबई

Mumbai Crime : 'त्या' पती-पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; दोघेही झाले होते, गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धारावी येथे घरगुती वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीचाही उपचारादरम्यान पत्नीपाठोपाठ गुरुवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी धारावी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

धारावीमधील नाईकनगर येथील वस्तीमध्ये प्रिया धुरिया व अनिल धुरिया हे दाम्पत्य वास्तव्यास होते. पती अनिलला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. अनिल बुधवारी दारू पिऊन घरी आल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणामुळे त्यांचा दीड वर्षाचा मुलगा रडू लागल्यानंतर शेजारी राहणारी महिला त्याला आपल्या घरी घेऊन गेली.

त्यानंतर अनिलने मद्यधुंद अवस्थेत घरातील रॉकेल प्रियाच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावरही पेट्रोल ओतून घेतले व आग लावली. या घटनेत दोघेही गंभीररित्या भाजले. त्यांना तत्काळ शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी प्रियाचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ रात्री उशिरा अनिलचाही मृत्यू झाला. या घटनेत पत्नी 100 टक्के, तर पती 90 टक्के भाजला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

प्रेक्षकांना कसा वाटला 'मी कात टाकली'चा पहिला एपिसोड? नेटकरी म्हणतात- मुख्य नायिकेचे डोळे बघूनच...

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Marathi News Live Updates: गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबाराचा प्रकार; संजय गायकवाड यांनी कारवाईची केली मागणी

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

SCROLL FOR NEXT