मुंबई

लॉकडाऊननंतर परदेशी सिगरेटची तस्करी वाढली; न्हावाशेवा येथून पाच कोटींच्या सिगरेट जप्त

अनिश पाटील

मुंबई - लॉकडाऊननंतर परदेशी सिगरेटची मागणी खूप मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे आता दुबईतून मोठ्याप्रमाणात परदेशी सिगरेटची तस्करी करण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने(डीआरआय) दोन कोटी सिगरेट जप्त केल्या असून त्यांची किंमत 30 कोटी रुपये आहे. शनिवारी न्हावा शेवा बंदरातून पाच कोटींच्या सिगरेट जप्त करण्यात आल्या आहेत.

पाकीटांच्या नावाखाली लपवून परदेशी सिगरेटची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती महसुल गुप्तवार्ता संचलनालयाला(डीआरआय)मिळाली होती .त्यानुसार  न्हावाशेवा बंदरावरून एका कंटेनरमधून 21 लाख 60 हजार गुडंग गरम सिगरेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत चार कोटी 75 लाख 20 हजार रुपये आहे. लॉकडाऊननंतर परदेशी सिगरेटची मागणी प्रचंड वाढल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली. दुबईवरून हे कन्साईन्मेन्ट आले होते. याप्रकरणी अद्याप कोणाला अक रकरण्यात आलेले नसली, तरी महत्त्वाचे पुरावे डीआरआयच्या हाती लागले आहेत. आरोपींनी बनावट कागदपत्राच्या सहाय्याने आयात-निर्यात कोड मिळवला होता. त्याच्या सहाय्याने हा माल दुबईवरून आणण्यात आला.

कोरोनाच्या काळात मोठ्या टोळ्या सिगरेट तस्करीत सक्रिय आहेत. गेल्या दोन महिन्यात परेदशी सिगरेट तस्करीबाबत मुंबई डीआरआयची ही पाचवी  कारवाई आहे. यापूर्वी जत्तीपूर येथे तीन, तर न्हावाशेवा येथे दोन कारवाया करून दोन कोटी सिगरेड जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत 30 कोटी रुपये आहे.  या संपूर्ण प्रकरणा मागे मोठे रॅकेट सक्रिय असून दुबईवरून हा माल मुंबईत आणला जातो. त्यासााठी बोगस आयात-निर्यात कोडचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी त्रयस्थ व्यक्तीची कागदपत्रे घेऊन ही बोगस आयात-निर्यात कोड मिळवले जातात. त्यानंतर दुस-या वस्तूच्या नावाखाली सिगरेटची तस्करी केली जाते. काळात सिगरेटची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे या सिगरेट चढ्या भावाने विकून मोठा फायदा कमवण्याचा या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

----------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

mumbai crime marathi foreign cigarettes increased after the lockdown live latest updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT