Fraud Sakal
मुंबई

Mumbai Crime : रजनीकांतसोबत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीला गंडवलं; १० लाख लुबाडले!

आरोपींनी या तरुणीला चित्रपटासंदर्भातली कागदपत्रंही दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतल्या दहिसर परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय मुलीची सुपरस्टार रजनीकांत सोबत काम करण्याची संधी देतो असं सांगत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या मुलीला १० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीने पोलिसांत तक्रार दिली आहे.

या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, दहिसर पोलिसांनी आरोपी पियुष जैन व मंथन रुपारेल या दोघांवर कलम ४१९,४२०, ४६५, ६८, ४७१, ४ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीला हैद्राबादच्या व्यंकटेश्वरा क्रिएशनने दोन सिनेमांची ऑफर दिली होती. RC-15 आणि जेलर असे दोन सिनेमे आपण बनवत आहोत, त्या दोन्ही चित्रपटांमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करण्यासाठी निवड झाल्याचं या मुलीला सांगण्यात आलं होतं.

या भूमिकेसाठी पासपोर्ट, फॉरेक्स कार्ड, सरकारी परवानग्या हे सगळं तयार करण्याच्या नावाखाली आणि इतर विविध कारणं देऊन आरोपींनी १० लाख ३१ हजार ६३६ रुपये उकळले होते, असा आरोप तरुणीकडून करण्यात आला आहे. आरोपी पियुष जैन व मंथन रुपारेल यांनी या तरुणीला बनावट कागदपत्रंही तयार करून ती खरी असल्याचं सांगितलं होतं आणि या तरुणीला ती मेलवर पाठवली होती. मात्र दोघांनी कुठल्याही चित्रपटात काम न देता घेतलेली रक्कम ही परत न केल्यामुळे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT