Mumbai Crime 
मुंबई

Mumbai Crime : धक्कादायक! आधी जोडीने प्यायले दारू, नंतर पतीने केली पत्नीचीं हत्या

शर्मिला वाळूंज

बदलापूर : बदलापूर मध्ये धक्कादायक प्रकार घडला असून. पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. आधी हे दोघेही दारू प्यायले होते आणि नंतर आरोपी ओम प्रकाश विश्वकर्मानं पत्नी अनिताची गळा आवळून हत्या केली.

बदलापूरच्या मांजर्ली परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बदलापूरच्या मांजर्ली परिसरातील एका इमारती मध्ये आरोपी ओमप्रकाश विश्वकर्मा आणि त्याची पत्नी अनिता हे कुटुंबियांसह राहत होते. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास पती ओमप्रकाश आणि पत्नी हे दोघेजण दारू प्यायला बसले होते. यावेळी त्यांचे पुन्हा वाद झाले. वादाचे व्हिडिओ ओमने पत्नीच्या भावाला पाठवले.

संध्याकाळी पाच वाजता त्याने पत्नीच्या भावाला मेसेज केला की मैने उसको खलास किया. या घटनेमुळं मांजर्ली परिसरात एकच खळबळ माजली होती. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी ओम प्रकाश विश्वकर्माच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की ओमप्रकाश विश्वकर्मा आणि त्याची पत्नी अनिता यांचे एक वर्षापूर्वी लग्न झालेले होते, हे दोघांचेही सेकंड मॅरेज आहे.या दोघांमध्ये वाद होते,तसेच दारू प्यायचे दोघांना व्यसन होते.आरोपी पती हा तिच्यावरती नेहमी संशय घेत असत.

यापूर्वी भांडणामुळे पोलिसांना काही तक्रारी पण प्राप्त झाल्या होत्या, पोलिसांनी त्यांच्या घरी कौन्सिलिंग केले होते.मात्र परत त्याच्यात वाद झाला आणि आरोपीने व्हिडिओ देखील काढून पत्नीच्या भावाला पाठवले आणि पाच वाजता त्यांनी मेसेज केला की मैने उसको खलास किया. दरम्यान ही बाब समजताच 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT