sex racket sakal
मुंबई

Mumbai Crime : 'स्पा'च्या आडून सेक्स रॅकेट; चार तरुणींची सुटका

मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

मुंबई - मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी स्पा चालक आणि मॅनेजरला अटक केली आहे. स्पा चालक मोहम्मद हुसेन ऊर्फ सोनू मोहम्मद अकम शेख, मॅनेजर दिपू नारायण असे अटक आरोपीचे नाव असून, कारवाईत 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच जागा मालक नीलेश शहा विरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

प्रभादेवी येथील इराणी चाळीत असलेल्या 'सिल्वर थायी स्पा' येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 3 ला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठवून सापळा रचला. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच, पथकाने छापा टाकून कारवाई केली. तेव्हा स्पा चालक मोहम्मद हुसेन ऊर्फ सोनू मोहम्मद अकम शेख, मॅनेजर दिपू नारायण तसेच जागा मालक नीलेश शहा हे स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली जागेचा वापर कुंटणखान्यासाठी करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार, गुन्हा नोंदवित त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. स्पा सेंटरमधून सुटका केलेल्या चार तरुणींना चेंबूर येथील वात्सल्य गृहात पाठविण्यात आले आहे. याबाबत दादर पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, अनेक सदनिकांमध्ये असा व्यवसाय सुरू असल्याच्या घटना घडत असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. असा प्रकार नजरेस आल्यास तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणावे असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT