four arrested esakal
मुंबई

धक्कादायक! 14 वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांचा अनैसर्गिक अत्याचार; आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गोरेगाव पूर्व येथे 14 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

त्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिडोशी पोलिसांनी या प्रकरणी 18 व 19 वर्षांच्या दोन मुलांना अटक केली. तसेच या गुन्ह्यात 15 वर्षे व 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलांचाही समावेश असून त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरणही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व आगार येथील ट्रक स्टॅन्डच्या मागे हा प्रकार घडला. पीडित मुलगा 2 मे रोजी घटनास्थळी असताना आरोपी मुले तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करून जबरदस्तीने त्याला तेथील ट्रक स्टॅन्डच्या मागे नेले.

तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचे चित्रीकरण केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने याबाबत कोणालाच काही सांगितले नाही. अखेर त्याने याप्रकरणी दिंडोशी पोलिसांकडे तक्रार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT