Mumbai Police sakal media
मुंबई

मुंबई पोलिसांचं 'ऑपरेशन ऑलआऊट'; ६० आरोपींना पकडण्यात यश

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापरिनिर्वाणदिनानिमीत्त होणारी गर्दी लक्षात घेता, शहरात कोणत्याही घातपाती कारवाया होऊ नयेत, यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मिशन ऑलआऊट (Mission All out) राबवलं. यात संशयित ठिकाणांवर छापे मारणं, हॉटेल्स, लॉज यांची चौकशी करणं, रेकॉर्डवरील गुन्हेगांरांची चौकशी करणं (criminal investigation), नाकाबंदी करणं, बाहेरुन येणाऱ्या गाड्या तपासणं, संशयित व्यक्तींची चौकशी करणं, फेरीवाल्यांची चौकशी करणं, अवैध धंद्यांवर छापे (raid on illegal business) मारणं अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. मुंबईच्या पाचही प्रादेशिक विभागांचे अप्पर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळांचे पोलीस उपायुक्त, सर्व सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस स्टेशन्सचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार असे सर्वजण या ऑलआऊट मिशनमध्ये सहभागी झाले होते. या कारवाईत पोलिसांना अनेक गुन्हेगारांना पकडायला मदत झाली. या ऑपरेशनमध्ये पोलिसांना रेकॉर्डवरचे पाहीजे असलेले 60 आरोपी (sixty culprit arrested) पकडण्यात यश आलं आहे.

तर अजामीनपात्र वॉरंट असलेले 95 आरोपी सापडले. पोलिसांनी या ऑपरेशनमध्ये जवळपास 47 अवैध दारु विकण्याच्या ठिकाणांवर छापे मारुन ती उद्ध्वस्त केलीत, तर अमली पदार्थ विकणाऱ्या 197 जणांना पकडणं पोलिसांना शक्य झालं आहे. ऑपरेशनदरम्यान 62 व्यक्तींकडून अवैध शस्र मिळून आलीत, तर 52 तडीपार असलेले आरोपीही या ऑपरेशन दरम्यान पोलिसांना सापडलेत. तर संशयितरित्या फिरणाऱ्या 181 जणांची चौकशी करण्यात आली.

मुंबईत कोणताही मोठा इव्हेंट असेल, दिवळी, नाताळ सीरखा सण असेल नववर्ष असेल, अशा प्रत्येकवेळी मुंबईत हे मिशन ऑलआऊट राबवलं जातं. यामुळं पोलिसांना हवे असलेले अनेक गुन्हेगार तर मिळतातच पण जर चुकीच्या उद्देशानं कुणी शहरात आलेलं असेल, काही समाजकंटक काही समाजविघातक कृत्य करण्याच्या तयारीत असतील, तर पोलिसांना ते थांबवणं अशा ऑपरेशन्समुळं शक्य होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT