Debit card 
मुंबई

देशातील कार्डधारकांच्या संख्येत वाढ; व्यवहारांची उलाढाल वाढली

98 कोटी डेबिट व क्रेडिट कार्डे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाकाळात देशातील कार्डधारकांची संख्या तसेच डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढली असून सप्टेंबर अखेरीस देशात 92.03 कोटी डेबिट कार्डे व 6.50 कोटी क्रेडिट कार्डे आहेत.

मार्च 2020 मध्ये कोरोनाचा फैलाव सुरु झाला तेव्हा तसेच यावर्षीच्या एप्रिल मध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान कार्ड व डिजिटल पेमेंटचे प्रमाण थोडे मंदावले. मात्र त्यानंतर पुन्हा हे व्यवहार पूर्वीपेक्षाही जोमाने सुरु झाले. डेबिट कार्डांच्या संख्येत गेल्यावर्षीपेक्षा 8.65 टक्के व क्रेडिट कार्डांच्या संख्येत गेल्यावर्षीपेक्षा 10.78 टक्के वाढ झाली. तर मागीलवर्षाची आणि यावर्षाची जुलै ते सप्टेंबर ही तिमाही यांचा विचार केल्यास डिजिटल पेमेंटचे व्यवहार 103 टक्के वाढले आहेत. या तिमाहीत क्रेडिट कार्डांचे 2.32 लाखकोटी रुपये मूल्याचे 55.72 कोटी व्यवहार झाले. तर डेबिट कार्डांमार्फत 1.88 लाखकोटी रुपये मूल्याचे 148 कोटी व्यवहार झाले. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यांच्या व्यवहारांची संख्या 43 टक्के वाढली मात्र त्यांचे मूल्य 13 टक्के कमी झाले.

डिजिटल पेमेंट होऊ शकेल अशा पीओएस टर्मिनलची संख्याही सतत वाढते आहे. यावर्षी जानेवारीत ती 47.10 लाख होती तर सप्टेंबर अखेरीस ती 49.7 लाख झाली आहे. युपीआय पेमेंट पद्धतीने यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये 54 टक्के व्यवहार व्यक्तींमध्ये झाले तर 46 टक्के व्यवहार खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये झाले. या प्रकारात साडेसहा लाखकोटी रुपये मूल्याचे पावणेचार अब्ज व्यवहार झाले. तर ऑक्टोबरमध्ये पावणेआठ लाखकोटी रुपये मूल्याचे चार अब्ज व्यवहार झाले. या तिमाहीत 30 बँका या व्यवहार पद्धतीत सहभागी झाल्याने यात सहभागी असलेल्या एकूण बँकांची संख्या 259 झाली.

दुकानांमधील पीओएस टर्मिनल व्यवहारांमध्ये खासगी बँकांचे वर्चस्व असून त्यांच्यामार्फत 67 टक्के, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकामार्फत 26 टक्के व्यवहार झाले. पेमेंट बँकांद्वारे सहा टक्के तर परदेशी बँकांमार्फत एक टक्का व्यवहार झाले. हे चाळीस ते पन्नास टक्के व्यवहार छोटी दुकाने, हॉटेल येथे होतात. एचडीएफसी बँक, युको, अॅक्सीस, आयसीआयसीआय, आरबीएल, स्टेटबँक या बँका या व्यवहारांमध्ये आघाडीवर आहेत.

महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हे व्यवहार सर्वात जास्त होतात. हैदराबाद, बंगळुरू, चैन्नई, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाटा, कोईंबतूर, अहमदाबाद आणि वडोदरा या दहा शहरांमध्ये अशा व्यवहारांची संख्या सर्वात जास्त आहे. ही माहिती इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT