Delta plus virus sakal media
मुंबई

मुंबईला दिलासा; तिसर्‍यांदाही डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण नाही

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनामधून होणाऱ्या मृत्यूंची (corona deaths) संख्या शून्यावर आल्यावर आणखी एक दिलासादायक बाब समोर आली असून जिनोम सिक्वेंसिगच्या (Genome Sequencing) तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. 54% लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंट (delta variant) आहे आणि 34% लोकांमध्ये डेल्टा पेक्षा कमी तीव्रता असलेला व्हेरियंट आहे आणि डेल्टा प्लस चा एकही रुग्ण (no delta plus patient) नाही त्यामुळे ही एक समाधानाची बाब आहे, पण काळजी घेणं जरुरी आहे आणि लवकरात लवकर लसीकरण (vaccination) करणं गरजेचं आहे असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी सांगितले.

एकूण 343 नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 54 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 34 टक्के तर इतर प्रकारांचे 12 टक्के रुग्ण या निरीक्षणातून समोर आले आहे. जिनोम सिक्वेसिंगच्या तिसर्‍या तुकडीमध्ये एकूण 343 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कोविड बाधा झालेल्या एकूण 343 रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. नमुने घेतलेल्या बाधित 343 रुग्णांपैकी 45 रुग्ण (12 टक्के) रुग्ण हे 0 ते 20 वर्षे आतील वयोगटातील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 126 रुग्ण (37 टक्के), 41 ते 60वर्षे वयोगटात 98 रूग्ण (29 टक्के) 61 ते 80 वयोगटात 63 रुग्ण (18 टक्के) आणि 81 ते 100 वयोगटातील १11 रुग्ण (3 टक्के) या चाचणीमध्ये समाविष्ट आहेत.

चाचणीतील निष्कर्षानुसार, 343 पैकी 185 रुग्ण (54 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर 117 रुग्ण (34 टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे 40 बाधित रुग्ण (12 टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे. डेल्टा व्हेरियंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या 55 नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त 7 जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. 55 पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दोन्ही डोस घेतलेल्या 168 नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त 46 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही  7 जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.

याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या 121नागरिकांना बाधा झाली. त्यातील 57 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाब ग्रस्त होते. यातील दोघांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर एकास ‘डेल्टा व्हेरियंट’ ची लागण झालेली होती. मात्र, या तिन्ही रुग्णांनी कोविड बाधा निष्पन्न होवूनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्याने त्यांच्या जीवावर बेतले.

याचाच अर्थ, कोविड लस घेणाऱ्यांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱयांना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता रोखता येते, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. वय वर्ष 18 पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण 343 रुग्णांपैकी 29 जण (8 टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी 11 जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’, 15 जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ आणि 3 जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT