Electric Water Taxi  sakal
मुंबई

Mumbai Electric Water Taxi : दिवाळीत सुरु होणार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी,मुंबईकर करणार स्वस्त प्रदूषण मुक्त जल प्रवास

मुंबईनजीकच्या शहरांतून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सुरु झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नितीन बिनेकर

मुंबई - मुंबईकरांना स्वतः आणि प्रदूषण मुक्त जलमार्गे प्रवास करता यावा यासाठी जलयान धारकांनी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशातील तीन कंपन्या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी ऑर्डर सुद्धा देण्यात आलेल्या आहे.

त्यामुळे दिवाळीनंतर प्रत्येक्षात इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईकरांचा सेवेत दाखन होणार आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सीचे तिकीट दर सुद्धा कमी होणार असल्याची माहिती जलयान धारकांनी सकाळला दिली आहेत.

मुंबईनजीकच्या शहरांतून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सुरु झाली आहे.

आता तर, खाडी मार्ग जोडण्याचा निर्णय सागरी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात जलद मार्गाचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करण्यात येणार आहे. परंतु सध्या सुरु असलेल्या वॉटर टॅक्सी पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनावर धावत असल्याने या सेवेचे तिकीट भाडे जास्त आहे.

त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना वॉटर टॅक्सीचा प्रवास परवडत नाही. त्यामुळे वॉटर टॅक्सीचे तिकीट दर कमी करण्यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रीक इंजिन असलेल्या बोटीचा वापराबाबत काही जलयान धारकांनी सागरी महामंडळाकडे तयारी दाखविली आहे. या बोटी खरेदीसाठी प्रकल्प फायनान्सर व बॅटरी उत्पादकासोबत चर्चा सुद्धा जलयान धारकांची झाली असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोव्हीडमुळे उशीर-

इन्फिनिटी हार्बर सर्व्हीसेसचे व्यवस्थापकीय भागीदार सोहेल कझानी यांनी सकाळला सांगितले की, सध्या सुरु असेल्या हायस्पीड वॉटर टॅक्सी चालविण्यासाठी मोठया प्रमाणात इंधनावर खर्च लागतोय.

त्यामुळे इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना स्वतः तिकीट दरात वॉटर टॅक्सी सेवा पुरविण्यासाठी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतले होता. परदेशातील तीन कंपन्या वॉटर टॅक्सी ऑर्डर सुद्धा देण्यात आलेल्या आहे. परंतु कोव्हीडमुळे ३० आठवड्यानंतर ऑर्डर प्लेस होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी यायला थोडा उशीर झाला आहे.

सहा महिन्यात काम पूर्ण -

सध्या दुबईतून एक वॉटर टॅक्सी आणली आहे. या वॉटर टॅक्सीला इलेक्ट्रिक टॅक्सीमध्ये कन्व्हर्ट करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. याशिवाय या इलेक्ट्रिक टॅक्सीचा चार्जिगसाठी जेट्टीवर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.

यासाठी जवळ जवळ सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. यंदाचा दिवाळीत प्रत्येक्षात पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरु होणार आहे. त्यानंतर वॉटर टॅक्सीचे तिकीट दर कमी करता येईल. तसेच प्रदूषण सुद्धा होणार नाही. पर्यावरणस्नेही वॉटर टॅक्सीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुद्धा वाढणार असल्याची माहिती इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT