KNOW 9 MAIN CAUSES BEHIND MUMBAI FLOODS esakal
मुंबई

26 July Mumbai Flood : ही ठळक 9 कारणं मुंबईची करतात तुंबई.. ! २६ जुलै २००५ च्या आठवणी

26 july 2005 mumbai rain: २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या भीषण पुरामध्ये अनेक रस्ते जलमय झाले होते, वाहतूक ठप्प झाली होती आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले होते.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Floods 9 Main Causes In Marathi :

दरवर्षी मुंबईत पावसाळा म्हटलं की, नको रे बाब... अशीच भावना बहुतांश लोकांच्या मनात येते. दर वर्षीचा जुलै महिना म्हणजे मुंबईकरांबरोबरच तिथे राहणाऱ्या देशभरातील नातेवाईकांच्या चिंतेचा विषय असतो.

याच ठळक कारण म्हणजे २००५ मध्ये आलेला पूर आणि त्यात मृत्यूमुखी पडलेले हजारो लोक. या पूराने अनेकांना बेघर केले, कित्येकांना अनाथ केले. हा पूर अनेकांच्या मनावर मोठे व्रण निर्माण करून गेला.

पण दर पावसाळ्यात मुंबईची तुंबई का होते? उपाय योजना करूनही या परिस्थितीत फारसा फरक का पडत नाही. यामागे काही ठळक कारणे आहेत. जाणून घेऊया.

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी नाले सफाई करते. पण तरीही मुंबईच सखोल भागात पाणी साचतेच. असे का होते? यासाठीचे कारणीभूत घटक जाणून घेऊया.

1.भौगोलिक परिस्थिती

मुंबई हे ७ बेटं जोडून तयार झालेलं आहे. पण बेटांवर एकूण २२ टेकड्या होत्या. दोन बाजूंना खाड्या आणि समुद्र. ही सर्व भौगोलिक परिस्थिती पूर येण्यासाठी अनुकूल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार घाटकोपर ते भांडूप दरम्यान आजही टेकड्यांची रांग दिसते. याच्या पुर्वेकडे खाडीजवळचा प्रदेश आहे. पूर्वी याच भागातून ठाणा नदी वाहायची असा उल्लेख बाँबे गॅझेटिअरमध्ये आढळतो. त्यामुळे एकाबाजूला टेकडी, दुसऱ्या बाजूला खाडी आणि मधला सखल भाग यामुळे इथे पाणी साचतं.

हे शहर विकसित करताना अनेक दलदलीच्या ठिकाणी भराव टाकण्यात आला. हा भरावाचा भाग सखल प्रदेशात असल्याने तिथे पाणी तुंबतं. काही भाग तर भरावा नंतरही सखल आहेत.

2.खारफुटी आणि मिठागराचा नाश

मुंबई तीन बाजूंनी समुद्राने वेढलेली आहे. खारफुटी जंगलांमुळे मुंबईचा किनारा सुरक्षित राहतो. खारफुटीचं जंगल समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करतं आणि जमिनीवर पाणी पसरू देत नाही.

पण वाढत्या लोकसंख्ये बरोबर वाढत्या झोपडपट्ट्या आणि इमारतीमुळे खारफुटींची जंगलं आणि मिठागरं नष्ट होत चालल्याचंं मत पर्यावरणतज्ज्ञ आणि अभ्यासकांचं आहे.

त्याचप्रमाणे मिठागकंगी मुंबईला सुरक्षित ठेवण्याची मोठी भूमिका आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या बाजूला असलेल्या या मिठागरांमध्ये खाडीचं खारं पाणी साठतं. हे पाणी थेट मुख्य शहरात आलं तर समस्या गंभीर होतील असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

3.पावसाचं प्रमाण आणि भरती

मुंबईच्या पावसाचे पॅटर्न गेल्या काही वर्षात बदलले आहे. खूप कमी वेळात खूप जास्त पाऊस पडतो. भरती-ओहोटी या गोष्टींचा प्रभाव पडतो. मुसळधार पाऊस असताना चार मीटरच्या वर भरती असेल तर मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी तुंबतं.

मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा पर्जन्य जलवाहिन्यांमार्फत समुद्रातच केला जातो. पण प्रचंड पाऊस पडला तर हे पाणी समुद्रात सोडणारे दरवाजे भरतीच्या वेळी बंद केले जातात. त्यामुळे पाणी तुंबते.

4.शहराची वाढ आणि नियोजनाचा अभाव

मुंबई शहराची दिवसेंदिवस होणारी वाढ ही भराव टाकून करण्यात आली आहे. या वाढलेल्या शहराच्या सांडपाण्याच्या निचऱ्याविषयी कोणतीही नियोजनबद्ध विचार झाला नाही. शिवाय रस्ते बांधणी करतानाही काही विचार केलेला दिसत नाही. मध्ये उंच आणि दोन्ही बाजूने उतरते शिवाय पाणी जायला गटारं हवीत पण तसे दिसत नाही.

5.तळी बुजवली

लालबाग परळ भागात असलेल्या गिरण्यांच्या आवारात तळी होती. त्या तळ्यांमधलं पाणी गिरण्यांधल्या कामांसाठी वापरलं जायचं. या तळ्यांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत होता. पण विकासाच्या नावाखाली ही तळी बुजवण्यात आली.

6.यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव

मुंबईत MMRDA, MSRDC, MHADA, MMRC, महावितरण, रिलायन्स एनर्जी, रेल्वे, मुंबई महापालिका, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोर्ट ट्रस्ट, पोस्ट, लष्कर, विमानतळ प्राधिकरण अशा वेगवेगळ्या यंत्रणा एकाच वेळी काम करतात. पण या यंत्रणांमध्ये समन्वय नाही. यापैकी कोणती ना कोणती यंत्रणा सतत रस्त्यांवर काम करत असते. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

7.महापालिकेचा बेजबाबदार कारभार

मुंबई महापालिकेचा बेजबाबदार कारभारही मुंबईची तुंबई होण्यास कारणीभूत आहे असं मत अनेक जण व्यक्त करतात. महापालिका पावसाळ्या आधी काम करते असं सांगितलं जातं पण त्यात पारदर्शकता नसल्याचे सांगितलं जातं.

8.ड्रेनेज

मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या ब्रिटीशांनी बांधल्या आहे. १०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी बांधलेल्या या जलवाहिन्या त्या वेळच्या लोकसंख्येचा आणिशहराचा विचार करून बांधण्यात आल्या होत्या. पण झपाट्याने झालेला उपनगरांचा विकास याला त्या पुरे पडू शकत नाहीत.

9.नद्यांचा ऱ्हास

मुंबईत दहिसर, मिठी, ओशिवरा आणि पोयसर अशा चार प्रमुख नद्या आहेत. तसंच मुंबईच्या जवळून वैतरणा, तानसा, उल्हास अशा नद्या वाहतात. मुंबईतल्या नद्या आज फक्त नाल्यांच्या रूपात अस्तित्त्वात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: टीम इंडियात पाचव्या कसोटीसाठी मोठा बदल; रिषभ पंत संघातून बाहेर, तर 'या' खेळाडूची झाली निवड

ENG vs IND: मँचेस्टरमध्ये ड्रामा! स्टोक्सने कसोटी संपल्यावर जडेजा, वॉशिंग्टनसोबत खरंच हस्तांदोलन टाळलं? Video Viral

ENG vs IND: जडेजासोबत इंग्लंडच्या खेळाडूंची बाचाबाची? मँचेस्टर कसोटीच्या शेवटी नेमकं काय घडलं? पाहा Video

ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकं

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

SCROLL FOR NEXT