Transgender Salon Sakal
मुंबई

Transgender Salon : मुंबईला मिळालं पहिलं ट्रान्सजेन्डरच्या मालकीचं सलून

या सलूनमध्ये तब्बल सात लोकं काम करतात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : तृतीयपंथी समाजाला दैनंदिन आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर अनेकदा सामान्य लोकांकडून त्यांना हीन लेखलं जातं. त्यांना इतरांप्रमाणे चांगली वागणूक समाजाने द्यावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यांना रोजगार आणि व्यवसायासाठी अनेकदा विरोधही केला जातो पण मुंबईत तृतीयपंथीयांकडून चालवले जाणारे पहिले सलून सुरू करण्यात आले आहे.

या सलूनमध्ये तब्बल सात लोकं काम करत असून झैनाब असं या सलूनच्या मालकाचे नाव आहे. झैनाब या तृतीयपंथी असून या समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावं या हेतून त्यांनी हे सलून सुरू केले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सलूनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांना प्रशिक्षण तसेच रोजगार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉइश बँक आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या सहकार्याने हे सलून सुरू करण्यात आले.

ज्या समाजात ट्रान्सजेंडर समुदाय खूप वेगळा आणि दुर्लक्षित समजला जातो, त्या समाजासाठी हे छोटेसे पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. हेच छोटे पाऊल समाजासाठी मोठी झेप ठरणार असल्याचं सूतोवाचही झैनाब यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT