Vaccination Sakal
मुंबई

मुंबईत राजकारण्यांना मिळाला लसीचा तिसरा बूस्टर डोस, पण का?

सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस दिले जात आहेत.

दीनानाथ परब

मुंबई: सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे (Vaccine) दोन डोस दिले जात आहेत. पण मुंबईत (Mumbai) काही आरोग्य कर्मचारी, (health workers) राजकारणी आणि त्यांच्या स्टाफने कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस घेतल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे काही देशांमध्ये तिसरा डोस दिला जातोय. काही पाश्चिमात्य देशांमध्ये असा तिसरा डोस देण्यात आला आहे. त्याला बुस्टर डोस (Booster dose) म्हणतात.

या बुस्टर डोसबद्दल वैद्यकीय क्षेत्रात एकमत नाहीय. त्यावरुन वेगवेगळी मत-मतांतरे आहे. बुस्टर डोसला प्राधान्य नाहीय. तिसऱ्या डोसबद्दल लवकर निर्णय घेणार नसल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे तिसरे डोस घेतले आहेत. को-विन वर रजिस्ट्रेशन न करता किंवा वेगळे फोन नंबर वापरुन लसीचा तिसरा डोस मिळवल्याची माहिती आहे.

तिसरा डोस घेण्याआधी अनेकांनी शरीरातील अँटिबॉडीजची पातळीही तपासली. तिसरा डोस घेणाऱ्यांमध्ये बहुतांश डॉक्टर्स आहेत. ज्यांचे फेब्रुवारीमध्ये दोन डोस पूर्ण झाले होते. तपासणीमध्ये शरीरातील अँटिबॉडीज पातळी अत्यंत कमी असल्याचे आढळल्यानंतर त्यांनी तिसरा डोस घेतला. एक युवा राजकरणी, त्याची पत्नी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा बुस्टर डोस घेतला.

बुस्टर डोससाठी अनेकांनी कोव्हिशिल्डची निवड केल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. उत्साहात घेतलेल्या तिसऱ्या डोसमुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकतो, असे अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. भावनांच्या नाही, तर विज्ञानाच्या आधारावर आपण ठरवलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

म्युच्युअल फंड : आर्थिक उद्दिष्टे आणि लाइफ सायकल फंड

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत येणार? तोडगा निघण्याची शक्यता!

Friendship Story: रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री श्रेष्ठ! देश-विदेशातून 54 डॉक्टर मित्र एकवटले; दिवंगत मित्राच्या कुटुंबासाठी 18 लाख जमवले

SCROLL FOR NEXT