आग  esakal
मुंबई

Mumbai : जुहू येथे हॉटेलमध्ये आग, १२ जण बचावले

या आगीमुळे हॉटेलमध्ये अडकलेल्या १२ जणांची सुखरूप सुटका केली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सांताक्रूझ (पश्चिम), जे डब्ल्यू मेरियट हॉटेलसमोरील तळमजला अधिक चार मजली जुहू रेसिडेन्सी हॉटेलमध्ये आज सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अवघ्या २० मिनिटात आग विझवली. तसेच, या आगीमुळे हॉटेलमध्ये अडकलेल्या १२ जणांची सुखरूप सुटका केली.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी नाही

जुहू रेसिडेन्सी या तळमजला अधिक चार मजली हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहक, पर्यटकांची ये - जा सुरू असताना हॉटेलमध्ये अचानकपणे आग लागल्याची घटना घडली या आगीची माहिती मिळताच हॉटेलमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली. सदर हॉटेलमधील कर्मचाऱयांनी प्रथम आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अवधीतच आग भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले. आगीमुळे हॉटेलमध्ये धावपळ सुरू झाली होती.

अनेक ग्राहक, पर्यटक आगीपासून बचाव होण्यासाठी हॉटेलबाहेर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तर या आगीमुळे हॉटेलच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर १२ जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून ४ फायर इंजिन, ३ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. आग सायंकाळी ५.२१ वाजता पूर्णपणे विझविली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी, मालक, पर्यटक, ग्राहक यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र सदर हॉटेलमध्ये आग का व कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT