drugs sakal media
मुंबई

पोटात ६५ कोकेनच्या कॅप्सुल ठेवणाऱ्या महिलेला अटक, ८ कोटींचे ड्रग्स जप्त

डीआरआयने कोरोना काळात 600 कोटींचे ड्रग्स पकडले

अनिष पाटील

मुंबई : मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (international airport) महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने(DRI) केलेल्या कारवाईत टान्झानियन महिलेच्या अंतरवस्त्रात कोकेनची पुडी (drugs) सापडली. त्यानंतर महिलेच्या पोटातून 65 कोकेनच्या कॅप्सुल असा एकूण आठ कोटी रुपयाचा(810 ग्रॅम) ड्रग्सचा साठा (drug stock) जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत डीआरआयने महिलेला अटक (woman arrested) केली आहे. कोरोना काळात डीआरआयने 646 कोटींचे ड्रग्स पकडले आहे.

किटवाना वरधा रामधानी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती अदिस अबाबा मार्गे टान्झानियाच्या दर-ए-सलाम येथून मुंबईत 5 ऑगस्टला आली होती. आरोपी महिला ड्रग्ससह मुंबईत आली असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन तपासणी केली असता तिच्या अंतरवस्त्रात लपवलेल्या पुडीमध्ये 160 ग्रॅम कोकेन सापडले. पण महिलेकडे आणखी ड्रग्स असल्याची खात्रीलायक माहिती असल्यामुळे डीआरआने महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाने मागितली. परवानगी मिळाल्यानंतर जे.जे. रुग्णालयात महिलेची तपासणी करण्यात आली त्यात एक्स रेमध्ये महिलेच्या पोटात ड्रग्सच्या कॅप्सुल असल्याचे निष्पन्न झाले.

5 ते 9 ऑगस्ट हे पाच दिवस डॉक्टरांनी तिच्या पोटातून 65 कोकेनच्या कॅप्सुल काढल्या. चौकशीत मुंबईत येण्यापूर्वी तिने या कॅप्सुल गिळल्या असल्याचे डीआरआयला सांगितले. ती टान्झानियात लोकांना जेवण पुरवून उदरनिर्वाह करत होती. त्यावेळी अॅना नावाची एक महिला तिच्याकडे आली व तिने भारतात ड्रग्सची तस्करी करण्यास तिला सांगितले. त्या बदल्यात साडेतीन लाख रुपये दिला देण्याचेही कबुल केले होते. तसेच तिचा संपूर्ण प्रवास खर्च ती देणार होती. तिलाही पैसाची गरज अल्यामुळे किटवाना ड्रग्स देण्यासाठी तयार झाली.

गेल्या नऊ महिन्यांमध्ये चौथ्या परदेशी नागरीकाला डीआरआयडने ड्रग्ससह अटक केली आहे. कोरोना काळात विमान प्रवास बंद असल्यामुळे ड्रग्स तस्करीला मोठा फटका बसला होता. पण आता सर्व सुरळीत सुरू होत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात ड्रग्सची तस्करी केली जात आहे. आरोपी वैद्यकीय अथवा व्यावसायिक विजावर भारतात येत असून मुख्यतः हेरॉईन, कोकेन, मेफेड्रोन, अॅफेड्रीन व केटामाईनची तस्करी केली जात आहे. कोरोना काळात डीआरआयने 646 कोटींचे ड्रग्स पकडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

Praniti Shinde: भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा : खासदार प्रणिती शिंदे; जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं

SCROLL FOR NEXT