Fraud Sakal
मुंबई

बँकेची 42 कोटींची फसवणूक करणारा सराफा व्यापारी गजाआड

एक्सिस बँकेची 42 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील सुप्रसिद्ध सोने चांदीच्या व्यापाऱ्याला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

एक्सिस बँकेची 42 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील सुप्रसिद्ध सोने चांदीच्या व्यापाऱ्याला अटक केली.

मुंबई - एक्सिस बँकेची 42 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील सुप्रसिद्ध सोने चांदीच्या व्यापाऱ्याला अटक केली आहे. मुंबईतील त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या ज्वेलरी कंपनीच्या प्रवर्तकाला आर्थिक गुन्हे शाखेनेअटक केली आहे. आरोपी ज्वेलर्सने कथितपणे खाजगी बँकेकडून कॅश क्रेडिट सुविधेचा लाभ घेतला. परंतु, कर्जाची परतफेड करण्यात कंपनी अयशस्वी ठरली. आरोपी कंपनीच्या खात्यांच्या ऑडिटिमध्ये असे दिसून आले की, कंपनी आणि कंपनीच्या मालकाने कर्जाच्या पैशाचा वापर कंपनी संबंधित कामं व्यतिरिक्त इतर कारणांसाठी केला होता.

आरोपी हेमंत व्रजलाल झवेरी याने आपले घर विकून गेल्या सहा महिन्यांपासून ते फरार होता. तपास यंत्रणांनी अखेर त्याला मुलुंड पश्चिमेकडील फ्लॅटमधून अटक केली. जिथे तो अनेक महिने लपून वास्तव्य करत होता. अॅक्सिस बँकेने या वर्षी मार्चमध्ये हेमंत ब्रजलाल झवेरी, गिरीश नायक आणि त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांत तक्रार दाखल केली. नंतर प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड, 2015 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि त्यांचे कार्यालय मुलुंडमध्ये होते. आरोपी हे कंपनीचे संचालक होते,

आरोपी झवेरी आणि नायक यांनी 2015 मध्ये मौल्यवान धातू आणि हिरे यांच्या विक्री आणि खरेदीसाठी कॅश क्रेडिट सुविधेची एक्सिस बँकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार, बँकेने सप्टेंबर 2015 मध्ये कंपनीने अटी व शर्ती मान्य केल्यानंतर 36 कोटी रुपयांची कॅश क्रेडिट सुविधा मंजूर केली होती. पहिल्या काही वर्षांत कंपनीने बँकेला कर्जाच्या मासिक हप्त्यांची नियमित परतफेड केली. परंतु मे 2019 पासून परतफेड बंद झाली. वारंवार तगादा लावून सुद्धा बँकेच्या वाट्याला फसवणूक हाती आली. अखेरीस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाअंती आरोपी संचलकाला अटक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

१२ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष! विद्यापीठाने ५ दिवसांत लावले १७ अभ्यासक्रमांचे निकाल; उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क, वाचा...

Panchang 30 April 2026 : आजचे पंचांग! नृसिंह जयंती, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली

SCROLL FOR NEXT